Maratha Reservation : आरक्षणाचं खापर फडणवीसांनी शरद पवारांवर का फोडलं? आव्हाडांनी सगळं सांगितलं...

Maratha Reservation Issue Jitendra Awhad On Devendra Fadnavis : मराठा आरक्षणावरून आता भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत...
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama

Maratha Reservation Latest News : महाराष्ट्राचे राजकारण व्यवस्थित अभ्यासले तर गेल्या पन्नास वर्षांमध्ये आपण अयशस्वी झालो की त्याचे खापर हे शरद पवार यांच्या नावावर फोडायचे, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

मराठा आरक्षणाची तारीखजवळ आली. मात्र, आरक्षणाबाबत काहीच झालेले नाही. दिलेली प्रत्येक आश्वासने फेल गेल्याने त्यास बगल देण्यासाठी शरद पवार यांचे नाव घेत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. नागपूर येथे भाजपाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या ‘महाविजय 2024’ मेळाव्यादरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले.

Jitendra Awhad
Indapur OBC Melava : गाढवाची गोष्ट सांगत भुजबळांचा जरांगेंवर निशाणा | Chhagan Bhujbal

मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज राज्यात मोठी आंदोलने चालली आहेत. मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर, मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कुणी केला असेल तर तो शरद पवारांनी, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड प्रतिक्रिया दिली.

धनगरांना आरक्षण देणार होता, तेही पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत. पण, त्यांना अद्याप आरक्षण देऊ शकले नाही. मुस्लिम तसेच लिंगायत समाजाला आरक्षण देऊ शकले नाही. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण देऊ, असे सांगितले होते. तारीख जवळ आली. पण, अद्यापही आरक्षणाबाबत काहीच झालेले नाही. यावरूनच सत्ताधाऱ्यांनी दिलेले प्रत्येक आश्वासन हे अयशस्वी होत असल्यानेच विषयाला बगल देण्यासाठी शरद पवार यांचे नाव घेण्यात येत असल्याचे आव्हाड म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच शरद पवार यांनी एकदा तरी मराठा आरक्षणाविरोधात वक्तव्य केल्याचे दाखवून द्यावे, असे खुले आव्हानही आव्हाड यांनी फडणवीस यांना दिले आहे. द्वेष आणि समाजात भांडण लावण्यातही अयशस्वी होत असल्यामुळे तुम्ही बिथरले आहात. यामुळेच तुम्ही शरद पवार यांचे नाव घेत आहात, असेही जितेंद्र आव्हाड बोलले.

Jitendra Awhad
Amravati News : सरकारजवळ मराठा आरक्षणासाठी केवळ सात दिवसांचाच अवधी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com