Manoj jarange Patil On OBC Sub-committee News Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil News : आम्हाला काहीही हरकत नाही ; दलित, मुस्लिम, शेतकरी, आदिवासींसाठीही उपसमित्या करा!

Manoj Jarange Patil stated that he has no objection to the formation of sub-committees : ओबीसींची उपसमिती मायक्रो ओबीसींच्या फार फायद्याची ठरेल, असे वाटत नाही. त्यांच्यासाठीही उपसमिती करून गरिबांचा फायदा होऊ द्यावा ना.

Jagdish Pansare

Maratha Reservation News : हैदराबाद-सातारा गॅझेट लागू करण्याची मागणी मान्य झाल्यानंतर या निर्णयाने ओबीसी आरक्षणाला धक्का बसल्याचा आरोप केला जात आहे. तर गॅझेट लागू करण्याच्या निर्णयाने मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, अशी टीकाही केली जात आहे. ओबीसींची नाराजी नको म्हणून, विरोध सुरू होताच सरकारने तातडीने हालचाली करत ओबीसींसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली. यावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

आम्हाला हरकत नाही, आम्ही आखूड बुद्धीचे नाही, कुणी कितीही उपसामित्या केल्या, कितीही टोळ्या माझ्यावर पाठविल्या, कीतीही अफवा पसरवल्या तरी मराठ्यांना ओबिसीत (OBC) मीच घालणार. मी आणि माझा समाज मागे हटणार नाही, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. दलित, मुस्लिम, शेतकरी, आदिवासी, मायक्रो ओबीसी यांच्यासाठीही उपसमित्या करा, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.

ओबीसींची उपसमिती मायक्रो ओबीसींच्या फार फायद्याची ठरेल, असे वाटत नाही. त्यांच्यासाठीही उपसमिती करून गरिबांचा फायदा होऊ द्यावा ना. मी फक्त मराठ्यांचा नोकर, कुणाच्या सांगण्यावरून किंवा फडणवीसांना घेरायच असत तर थेट वर्षा गाठून आंदोलनं केल असत ना, असा टोलाही जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी यावेळी लगावला. आपण ना दोन्ही काँग्रेस, ना दोन्ही शिवसेना, ना दोन्ही राष्ट्रवादी, ना दोन्ही भाजपा कुणालाच मोजीत नाही. माझा मुद्दा फक्त आरक्षणाचा आहे.

माझ्यात आणि समाजात संभ्रम निर्माण होणार नाही. समाज माझ्या पाठीशी आहे, आज संभ्रम निर्माण करणारे कुठे होते? असा सवालही जरांगे पाटील यांनी केला. मराठवाड्यातील सर्व मराठा आरक्षणात घालणार, ते थोड्याच दिवसात तुम्हाला दिसेल. समाज अन् मी कुणावर विश्वास ठेवत नाही. हैद्राबाद अन् सातारा गॅझेटियर यात सरकारने हयगय करू नये. जर झालं नाही तर तुम्हाला पुन्हा रस्त्यावर फिरु देणार नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.

थोडे दिवस दम धरा, गॅझेटियर उकरून आणल आहे. त्यामुळे आता हे अस झालं रजिस्ट्री झाली, फेर होणारच. फक्त अंमलबजावणी राहिली आहे. त्यामूळे कुठलाही संभ्रम ठेवू नका, विदर्भ, खान्देश, कोकणमधील समाज बांधवांना आरक्षण मिळवून देण्यासाठीही आपण लढणार आहोत. कोकणातील बांधवांना आवाहन त्यांनी कुणाचं न ऐकता आरक्षण घ्यावं, असे आवाहन त्यांनी केले.

सातारा गॅझेटियर लागू करण्यासाठी आपण आग्रही आहोत. मराठा तोच कुणबी हे स्पष्ट आहे. 45 वर्षांत झालं नाही ते 2 वर्षांत करुन दाखवलं. आता विश्वासघात झाला तर येणाऱ्या निवडणुकीत दोन्ही विभागात त्यांचा सुपडा साफ होईल. काही चूक झाली तर दुरुस्तीची हमी सरकारच्या उपसमितिकडून घेतली असल्याचे जरांगे यांनी सांगीतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT