
Maratha reservation protest : मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पाच उपोषण केलं. तर त्यांच्यासोबत हजारो मराठा आंदोलकांनी आझाद मैदानावर ठिय्या देत आंदोलन केलं. त्यानंतर आता सरकारने मराठा समाजाच्या काही मागण्या मान्य केल्या.
त्यानंतर आता राजकीय विश्लेषकांकडून या आंदोलानाचा आगामी काळात नेमका काय प्रभाव पडणार याबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे. तर मुंबई ही विविध जाती-धर्माची आणि संस्कृतीची असल्यामुळे येथील मतदार जाती-पातीचा चा विचार न करता कोणता नेता किती काम करतो हे पाहून मतदान करतात.
त्यामुळे मराठा आंदोलनाने तापलेल्या राजकीय वातावरणाचा महापालिका निवडणुकीवर फारसा परिणाम होणार नसल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे. तर दुसरीकडे मराठा आंदोलन संपलं, सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्यामुळे ओबीसी समाज प्रचंड दुखावला आहे.
त्यामुळे ओबीसींच्या नाराजीचा फटका भाजपला बसण्याची शक्यता असून त्याचा अप्रत्यक्ष फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलनाचा सरकारला फारसा फायदा झाला नाही आणि आंदोलकांच्या हातालाही काही नवे लागले नाही. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत या आंदोलनाचा ठसा उमटण्याची शक्यता फारच कमी आहे.
शिवाय सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी कशी होणार, त्यावरच देखील अनेक राजकीय समीकरणे अवलंबून आहेत. तसंच ग्रामीण भागात मराठा समाजाची उपस्थिती निर्णायक असल्यामुळे पंचायत समिती, जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुकीवर आंदोलनाचा परिणाम होईल असं विश्लेषकांचे मत आहे.
ज्येष्ठ पत्रकार व विश्लेषक जयंत माईणकर यांच्या मते मुंबईतील सर्वसामान्य जनता या आंदोलनापासून लांबच राहिली आहे. तसंच मुंबईत जातीचे राजकारण चालत नाही. त्यामुळे या आंदोलनाचा मुंबई महापालिका निवडणुकीवर परिणाम होणार नाही.
तर ज्येष्ठ पत्रकार व विश्लेषक हेमंत देसाई म्हणतात, मुंबईत परिणाम होणार नसला तरी ग्रामीण महाराष्ट्रातील स्थानिकच्या निवडणुकीत या आंदोलनाचा मोठा परिणाम होऊ शकतो. मात्र ओबीसी नाराज असल्याने याचा फटका भाजपलाच बसू शकतो.
दरम्यान, या आंदोलनातून काही ठोस निष्पन्न झालं नाही हे सरकार आणि जरांगे पाटलांना माहीती आहे. त्यामुळे मुंबईतील निवडणुकीवर याचा थेट परिणाम होणार नाहीत पण ग्रामीण भागात त्याचे पडसाद उमटू शकतात, असं मत राजकीय विश्लेषक प्रा. सुमित म्हसकर यांनी मांडलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.