Manoj Jarange-Patil News  Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil News : मला कुणी सांगितले नाही, मनाला वाटले म्हणून शब्द मागे...

Jagdish Pansare

Maratha Reservation News : छगन भुजबळ जातीय तेढ निर्माण करत आहेत, ते महापुरुषांच्या जाती काढत असून, जातीवाद करत आहे. आम्ही शांततेची भूमिका घेतली असताना ते मात्र भाषणातून हात-पाय तोडण्याची भाषा करत आहेत. (Manoj Jarange Patil News) सरकारचीही हीच भूमिका आहे का? असा सवाल मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला केला.

मनोज जरांगे पाटील हे शहरातील अशक्तपणा जाणवत असल्याने एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर टीका केली. मी कधी जातीवाद केला नाही आणि करतही नाही. (Maratha Reservation) मात्र, काही जणांनी राजकीय स्वार्थापोटी तो विषय अंगावर ओढून माझ्या शब्दाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला.

राज्यात शांतता राहिली पाहिजे अशी माझी भूमिका आहे. समाजात संभ्रम निर्माण केला जात असल्याने मी तो शब्द मागे घेतला. (Marathwada) मला शब्द मागे घेण्यास कुणीही सांगितले नाही. मनाला वाटले म्हणून शब्द मागे घेतला. आता तो विषय संपला आहे. मराठा आंदोलकांना अटक करायचे नाही, असे सरकारने म्हटले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र, आता अटक करत आहेत. यासंदर्भात अधिकृत माहिती घेतल्यानंतर भूमिका घेणार आहे. सरकारने इतक्या दिवसांनंतर हा डाव रचला काय आणि पुढे सरकार मराठ्याबाबत हेच करणार आहे का? याचा शोध घेणार असल्याचेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. सगळ्यांनीच मराठ्यांना आरक्षण दिले नाही. तब्बल ७० वर्षांपासून सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर ढकलत आहेत.

त्यामुळे आता सामान्य मराठा पेटून उठला आहे. आम्ही आरक्षण मिळवणारच असे जरांगे यांनी ठणकावून सांगितले. मात्र, विषय भरकटवण्यासाठी ही एकमेकांवर चिखलफेक सुरू आहे. याला १ तारखेच्या सभेत उत्तर देणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. तसेच अवकाळी पावसामुळे शेतमालाचे अतोनात नुकसान झाले.

त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, त्यांना वाऱ्यावर सोडू नये, अशी हात जोडून विनंती असल्याचे जरांगे म्हणाले. आधीच पेरताना पुरेसा पाऊस झाला नाही, आता तर सगळेच पिके वाया गेली, सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT