Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती दिल्लीत; केंद्रीय मागासवर्गीय आयोगाची भेट घेणार

Chhatrapati Sambhaji Raje News : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे.
Sambhaji Raje
Sambhaji RajeSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे. सध्या जरांगे पाटील राज्यभर दौरे करत ठिकठिकाणी सभा घेत आहेत.

तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळांनी मराठा समाजाला सरसकट कणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शवत शिंदे समितीच रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे, तर सरकारने आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हालचाली सुरू केल्या आहेत. यातच आता संभाजीराजे छत्रपती हे मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात थेट दिल्लीत दाखल झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sambhaji Raje
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल, नेमके काय झाले ?

संभाजीराजे छत्रपती आणि मराठा समाजाचं शिष्टमंडळ केंद्रीय मागासवर्गीय आयोगाची भेट ते घेणार आहेत. या भेटी दरम्यान, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यात येणार आहे. मंगळवारी दुपारी 3 वाजता आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची भेट होणार आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, या भेटीत काय चर्चा होते, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला मंत्री छगन भुजबळांनी विरोध करत राज्य सरकारने स्थापन केलेली शिंदे समिती रद्द करण्याची मागणी केली आहे.

तसेच सर्वांची जनगणना करा, सर्वांचाच सर्व्हे करा, त्यानंतर मागासलेपण ठरवा, अशा मागण्या भुजबळांनी केल्या आहेत. यातच आता मराठा आरक्षणासंदर्भात कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती हे दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे यावर काय मार्ग निघतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

Sambhaji Raje
Anna Bansode : आमदार बनसोडेंचा सरकारला घरचा आहेर; '1 हजार कोटीचा घोटाळा' सोमय्यांकडे सोपवला...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com