prakash ambedkar manoj jarange patil sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : आंबेडकरांचा 'तो' दावा जरांगे-पाटलांनी खोडला; म्हणाले, भल्या-भल्यांना...

Manoj Jarange Patil On Assembly Election 2024 : 29 ऑगस्टला आयोजित केलेल्या बैठकीत पाडापाडीचा निर्णय घेतला जाणार आहे, असं जरांगे-पाटलांनी सांगितलं.

Akshay Sabale

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील सातत्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना दिसतात. पण, जरांगे-पाटील आणि फडणवीस यांच्यातील भांडण नकली असल्याचा दावा वंचित आघाडीचे नेते, प्रकाश आंबेडकर यांच्याकडून केला जात आहे. आंबेडकर यांच्या विधानावर जरांगे-पाटील यांनी भाष्य करत त्यांचा हा दावा खोडून टाकला आहे.

"मी आणि देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) एकत्र आहोत, असं प्रकाश आंबेडकर म्हणू शकत नाहीत. आंबेडकरांचा डाव भल्या भल्यांना कळत नाही," अशी प्रतिक्रिया जरांगे-पाटील यांनी दिली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील रूग्णालयात जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) यांच्यावर उपचार सुरू होते. आज जरांगे-पाटील यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर जरांगे-पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

जरांगे-पाटील म्हणाले, "29 ऑगस्टला बैठकीचं आयोजन केलं आहे. त्यात पाडापाडीचा निर्णय घेतला जाणार आहे. सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही ही चांगली गोष्ट आहे. गर्व हा संपत असतो. गर्वाला कधी वाढ नसते. सरकारला मराठ्यांनी दिलेल्या सत्तेचा गर्व आहे. मराठ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय करून इकडे बोंबलत बसायचं."

"सरकार फक्त आरक्षण देऊ, देऊ असं म्हणत आहे. पण, सरकारनं 'ईडब्ल्यूएस' आणि 'एसईबीसी' आरक्षण सुरू ठेवावं. सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी. सरकारनं जीवघेणे खेळ मुळांशी खेळू नये," असा इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे.

'जरांगे-पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील भांडण नकली आहेत. हे ठरवून झालेलं भांडणं आहे. ओबीसींना फसविण्यासाठी हे सर्व चालू आहे,' अस प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

यावर जरांगे-पाटलांनी म्हणाले, "मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आहोत, असं आंबेडकर म्हणू शकत नाहीत. प्रकाश आंबेडकर काय म्हणतात मला माहित नाही. त्यांचा डाव भल्या-भल्यांना कळत नाही. त्यांचा खूप अभ्यास आहे. आंबेडकर अन्यायाच्या बाजूने उभे आहेत."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT