Video Manoj Jarange Patil : पवारसाहेब, ठाकरे अन् पटोलेंना जरांगे-पाटलांचं थेट आव्हान; शिंदे सरकारलाही ठणकावलं

Manoj Jarange Patil On BJP : भाजपमधील लोकांचं डोके काम करत नाही. मराठ्यांपुढे शांत बसले नाही, तर तुमची राजकीय कारकीर्द मराठा संपवून टाकेल, असा इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे.
manaoj jarange patil nana patole uddhav thackeray sharad pawar
manaoj jarange patil nana patole uddhav thackeray sharad pawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही याबाबत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हान मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी दिलं आहे.

विरोधक आपली भूमिका स्पष्ट करत नसेल, तर सरकारनं मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा. विरोधकांची वाट पाहू नये, असंही जरांगे-पाटलांनी सरकारला ठणकावून सांगितलं आहे.

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारशी चर्चा झाली नसताना पाचव्या दिवशी बुधवारी उपोषण मागे घेतलं.

"समाजबांधवांनी मला बळजबरीनं सलाइन लावली. सलाइन घेत उपोषण करण्यात अर्थ नाही, म्हणून उपोषण सोडलं," असं जरांगे-पाटील यांनी सांगितलं. आता छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रूग्णालयात जरांगे-पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे-पाटलांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर निशाणा साधत विधानसभेच्या तयारीबद्दल माहिती दिली. जरांगे-पाटील म्हणाले, "दंगली घडवून आणणं हे छगन भुजबळ यांचं काम आहे. सरकारशी अजून बोलणं झालं नाही. पावसामुळे सरकारनं जनतेच्या कामात व्यस्त आहे."

manaoj jarange patil nana patole uddhav thackeray sharad pawar
Manoj Jarange Warrant : कोर्टात हजर राहण्याचे आदेश; जरांगेंच्या अटकेवर वकीलांनी स्पष्ट सांगितलं; म्हणाले...

"29 ऑगस्टला सर्व समाज एकत्र येणार असून 288 जागा लढायच्या की उमेदवार पाडायचे हे ठरविणार आहे. आमच्यावर अन्याय झाला, तर आम्ही पाडापाडी करणार आहोत. गोर गरीब मराठ्यांना मोठ करण्यासाठी लढाई लढत आहोत. 14 ते 20 ऑगस्टपर्यंत उमेदवारांची यादी करू. 20 ते 27 ऑगस्टपर्यंत यादीवर चर्चा करू. आणि 29 ऑगस्ट निवडणूक लढायची की उमेदवारांना पाडायचं हे ठरवू," असं जरांगे-पाटलांनी सांगितलं.

manaoj jarange patil nana patole uddhav thackeray sharad pawar
BJP Vs Manoj Jarange Patil : मराठा समाजाला 'OBC' तून आरक्षण देण्याची कुणाची हिंमत नाही; भाजप आमदाराच्या विधानानं चर्चेला उधाण

"भाजपमधील लोकांचं डोके काम करत नाही. मराठ्यांपुढे शांत बसले नाही, तर तुमची राजकीय कारकीर्द मराठा संपवून टाकेल. कोणी काहीही आरोप आणि काड्या करूद्या. मराठा आरक्षण हेच माझं ध्येय आहे," असं जरांगे-पाटलांनी (Manoj Jarange Patil) म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com