Manoj Jarange Patil, Chhagan Bhujbal Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil Vs Bhujbal : मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा भुजबळांना डिवचलं; म्हणाले, " धमकी द्यायला काय ते...?"

Maratha Reservation News : " जर कोणी धमकी दिली तर..."

Deepak Kulkarni

Chhatrapati Sambhajinagar News : मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे भुजबळांना आलेल्या धमकीनंतर पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे. याच धमकीवरून मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा भुजबळांना डिवचलं आहे.

धमकी द्यायला काय तो काय लहान माणूस आहे. धमक्या द्यायला कोणाला वेळ आहे, अशा शब्दांत जरांगे पाटलांनी छगन भुजबळांना(Chhagan Bhujbal) फटकारलं आहे. तसेच जर कोणी धमकी दिली तर त्याचं मी समर्थन करणार नाही.

त्यांच्या विचाराला विरोध आहे, पण व्यक्तीला विरोध नाही. मराठा आरक्षणाला विरोध केला तर तेच काय आणखी कोणीही असो, त्यांना सुटी नाही, असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला.

मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी सोमवारी मीडियाशी संवाद साधला. त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. ते म्हणाले, आधी सत्ताधाऱ्यांनी मला उपोषणाला बसवलं म्हणत होते. आता म्हणतात, विरोधकांनी उभं केले आहे.

त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्यातील सगळ्या पक्षांनी भान ठेवावं, तर सरकारने आमच्याकडून चाळीस दिवस घेतले आहेत.

...हे आंदोलन तुम्हाला सरकारला झेपणार नाही!

जरांगे म्हणाले, सरकारने मराठा आरक्षण (Maratha Reservation) द्यायला हवे, समितीला पुरावे सापडायला लावू नका. तुम्हाला 5000 पानांचा आधार मिळाला असून, त्या आधारे आरक्षण दिले पाहिजे. 40 दिवसांची मुदत संपल्यावर 24 तारखेनंतर होणारे आंदोलन शांततेच्या मार्गानेच असेल. मात्र, हे आंदोलन तुम्हाला झेपणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणावरून सरकारला घाम फोडणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे. आरक्षणासाठी सरकारला दिलेली मुदत संपली आहे, पण सरकारकडून मराठा आरक्षणाविषयी अद्यापतरी काही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत.

नाशिक, सोलापूर, जळगाव, बीड, सांगली, जालना अशा विविध भागांचा दौरा करून जरांगे पाटलांनी सरकारवरचा दबाव वाढवला आहे. आरक्षणासंबंधीची सरकारची मुदत 24 ऑक्टोबरला संपणार आहे. याआधीच आता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दंड थोपटलेल्या जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा वातावरण तापवण्यास सुरुवात केली आहे.

जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले...?

ओबीसी बांधवांना माझी विनंती असून,आमच्या गोरगरिबांचा प्रश्न आहे. आमच्या ताटात आणण्यासाठी आम्हाला साथ द्या, माती टाकू नका. आम्ही तुमचं काही केलं नाही. या नेत्यांचं ऐकू नका, राज्य आपले आहे. तसेच सदावर्ते यांच्यावर मला काहीच बोलायचे नसल्याचेही ते म्हणाले.

तसेच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आम्हाला पाठिंबा दिला म्हणतात, ते देणारच. तसेच सत्ताधाऱ्यांनीदेखील पाठिंबा दिला आहे. आंदोलकाची भूमिका अशी असते की, जे कोणी आलं त्याच्या पाठिंबा स्वीकारायचा, असे जरांगे पाटील म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT