Dhananjay Munde News: अमेरिकेच्या लोकांपेक्षा माझ्या गावाकडचे माणसं हुशार, धनंजय मुंडे असं का म्हणाले...

NCP News : एका पॅनलचे ३ दिले, दुसऱ्या पॅनलचे ३ दिले, तिसऱ्या पॅनलचे ३ दिले आणि चौथ्या पॅनलचा सरपंच निवडून आणला.
Dhnanjay Munde News, Beed
Dhnanjay Munde News, BeedSarkarnama

Beed News : राजकीय नेते आणि त्यांची भाषणं समर्थकांसाठी पर्वणीच असते. (Dhnanjay Munde News) राज्याच्या राजकारणात भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आपल्या विदेश दौऱ्यातील किस्से अनेकदा सांगत असतात. `हाऊ मच`, या त्यांच्या किश्शाने तर समर्थकांना अक्षरश: वेड लावले होते. प्रत्येक राजकीय पक्षात असे नेते आहेत, जे आपल्या राजकीय जीवनात आलेले अनुभव, प्रसंग, किस्से जाहीरपणे सांगत असतात.

Dhnanjay Munde News, Beed
Dhnanjay Munde On Beed Loksabha News : लोकसभा लढवण्याची माझी लायकी नाही, मी अजून खूप लहान..

राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) हे देखील आपल्या खुमासदार भाषणासाठी ओळखले जातात. तर राष्ट्रवादी काॅंग्रेस ओबीसी सेलचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या सत्कार समारंभात मुंडे यांनी असाच एक किस्सा सांगितला आणि उपस्थितीत पोट धरून हसले. (Beed News) ग्रामपंचायत निवडणुकीत तीन वेगवेगळ्या पॅनलची मतदारांनी कशी गोची केली होती, याचा किस्सा मुंडे यांनी रंगवून सांगितला.

मुंडे म्हणाले, मायच्यान गावाकडच्या माणसासारखा हुशार माणूस कुठंही सापडणार नाही. अमेरिकेच्या नागरिकांची आणि माझ्या गावाकडच्या माणसाच्या बुद्धिमत्तेची बरोबरी होऊचं शकत नाही. (Ncp) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा अनुभव मी तुम्हाला सांगतो, माझ्या गावाकडच्या माणसासारखा हुशार माणूस जगात कुठं सापडणार नाही. एवढा माझा गावाकडचा माणूस बुद्धीनं श्रेष्ठ आहे, तुम्ही म्हणाल हे कसं ? माझ्या मतदारसंघात एक गाव आहे, आबा कानात सांगतील, मी जाहीर सांगणार नाही.

गावातली लोक एवढी हुशार. ग्रामपंचायतची निवडणूक लागली, चार पॅनल उभा केले. मतदार एवढे हुशार. नऊ पंच, एक सरपंच निवडून द्यायचा होता. एका पॅनलचे ३ दिले, दुसऱ्या पॅनलचे ३ दिले, तिसऱ्या पॅनलचे ३ दिले आणि चौथ्या पॅनलचा सरपंच निवडून आणला. मग सांगा गावाकडंचा माणूस साधा आहे का ? हे कशासाठी सांगतोय, उद्या ज्यावेळी कुठल्याही निवडणुकीची मत मोजणी होईल तेव्हा हे सगळं कळत असतं.

या गावातलं मतदान फलाण्याचं फलाण्याला अन बिस्तान्याचं बिस्तान्याला पडलंय, हे लक्षात ठेवा. म्हणून आपण ग्रामपंचायतीमध्ये, सेवा सोसायटीमध्ये हुशारी कराल. पण मोठ्या निवडणुकीत आपली हुशारी मतदान यंत्रातून गावच्या प्रमुख माणसाला आणि निवडणुकीत उभ्या राहिलेल्याला नक्कीचं कळते, असा टोला देखील मुंडे यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com