Manoj jarange On Devendra Fadnavis  Sarkarnama
मराठवाडा

Manoj jarange On Fadnavis : 'गृहमंत्री फडणवीसांना माझे मराठे संरक्षण देतील, त्यांनी चर्चेसाठी यावं'; जरांगेंची स्पष्टोक्ती !

Manoj jarange On Fadnavis : फडणवीसांनी चर्चेला यावं, रस्त्यावर तुम्हाला कुणीही अडवणार नाही

Chetan Zadpe

Maratha Reservation News : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पुकारणारे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. दरम्यान, राज्यात बिघडत चाललेल्या कायदा सुव्यवस्था आणि मराठा आरक्षणासंदर्भात आज सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीयांचे एकमत झालेले आहे, तर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याबाबतही सर्वपक्षीयांनी आवाहन केले आहे. यावर आता जरांगेंनी चर्चेची तयारी दाखवली आहे. (Latest Marathi News)

सह्याद्री अतिथिगृहावर सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत फडणवीसांना चर्चेसाठी बोलावलेलं आहे. “आम्ही चर्चा व्हावी, यासाठी मागील चार दिवसांपासून तयारी दाखवत आहोत; पण सरकारच्या वतीने कुणी येत नाही. पण यांना काड्या टाकायची सवय. म्हणूनच मराठ्यांमध्ये दम धरत नाहीत. मराठे तापट आहेत. तुम्ही चर्चेसाठी या, फडणवीसांनी चर्चेला यावं, रस्त्यावर तुम्हाला कुणीही अडवणार नाही, माझे मराठा तुम्हाला संरक्षण देतील, असेही जरांगे म्हणाले.

जरांगे म्हणाले, "सरकारला वेळ आता कशासाठी पाहिजे? मराठ्यांना सरसकट आरक्षण देणार का? सर्वपक्षीय बैठकीचा तपशील घ्यायची माझी इ्च्छा नाही. गोरगरीब मराठ्यांकडे लक्ष द्यायचे सोडून, सरकार बैठका घेत आहे. मराठा समाजाच्या तरुणांच्या आत्महत्या घडत आहेत. तरुणांवर गुन्हे दाखल करायचं काम सरकार करतं. त्यामुळे सरकारला सुटी नाही. आरक्षण द्या, आणखी वेळ कशाला पाहिजे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणार का?" असा सवाल जरांगेंनी सर्वपक्षीयांना केला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT