Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil News: सकाळी क्रिकेट खेळले, दुपारी रुग्णालयात दाखल; जरांगे पाटलांना खोकल्याचा त्रास...

Jagdish Pansare

Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आज (ता.24) दुपारी छत्रपती संभाजीनगर येथील `गॅलेक्झी` या खासगी रुग्णालयात दाखल झाले. सातत्याने सभा आणि त्यातील भाषणांमुळे जरांगे पाटील यांना खोकल्याचा त्रास जाणवत आहे. (Manoj Jarange Patil News) शिवाय थंडी वाढल्यामुळे ताप आणि सर्दीचाही त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर डाॅक्टरांच्या सल्ल्याने जरांगे पाटील आज उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

आज सकाळीच अंतरवाली सराटी येथे क्रिकेट खेळतांनाच जरांगे पाटील यांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. (Maratha Reservation) मराठा आरक्षणाच्या लढ्याचे मैदान गाजवणारे मनोज जरांगे पाटील मैदानावर फटकेबाजी करताना दिसले. (Jalna) त्यांच्या या फटकेबाजीची चर्चा राज्यभरात होत असतांना दुपारी मात्र `व्हायरल` च्या त्रासामुळे त्यांना रुग्णालय गाठावे लागले.

डाॅक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे काही दिवस ते रुग्णालयातच थांबतील, अशी माहिती आहे. (Marathwada) मराठा आरक्षणासाठी शासन दरबारी सापडलेल्या कुणबी नोंदी ग्राह्य धरून नातेवाईक, सगेसोयरे आणि आईची जात गृहीत धरावी आदी मुद्यांवरून जरांगे पाटील आणि सरकारमध्ये काही मतभेद आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारच्या वतीने दोनवेळा शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली, पण त्यातून काही मार्ग निघाला नाही. ठरल्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांनी काल बीडमध्ये झालेल्या लाखोंच्या गर्दीसमोर 20 जानेवारी 2024 पासून मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठे शक्ती प्रदर्शन आणि मराठा समाजाची एकजूट दाखवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

ठरलेल्या नियोजनानुसार मुंबईत बेमुदत उपोषण सुरू करता यावे, यासाठी जरांगे यांनी आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये, याची काळजी त्यांचे सहकारी आणि शिष्टमंडळ घेत आहेत. आज खोकला, ताप आणि अंगात कणकण असल्याची तक्रार करताच जरांगे यांना तातडीने दुपारी रुग्णालयात आणण्यात आले.

काळजीचे काहीही कारण नसले तरी दौरे, सभा आणि भाषणांमुळे जरांगे पाटील यांना थकवा आल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपासून थंडीचे प्रमाणही वाढले आहे. कदाचित यामुळेही सर्दी, खोकला, ताप या सारख्या आजारांची लक्षणे त्यांच्यात दिसत आहेत. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा रक्तदाब व इतर नियमित चाचण्याही करण्यात येत आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT