Maratha Reservation Latest News : कायदा समंत करण्यासाठी कुणबी नोंदींचा आधार घ्यावा लागेल. नोंदी सापडण्यासाठी 30 दिवसांचा वेळ द्या म्हणाले तर आम्ही 40 दिवसांचा वेळ दिला. मंत्री गिरीश महाजन यांचा कायम सन्मानच केला. त्यांना कधीच परत पाठवले नाही. मात्र, आता वेळ देणार नाही, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
निर्णायक सभेसाठी आलेल्या जरांगे-पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. तुम्हाला कोणी संपर्क केला का? असा प्रश्न जरांगे-पाटील यांना विचारण्यात आला. गिरीश महाजन यांचा आताच फोन आला होता. मात्र, चर्चा सुरू राहील. पण वेळ देणे शक्य नाही. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आणि महाजन यांनी दिलेल्या शब्दांचा कायम सन्मान केला. गुन्हे मागे घेऊ म्हणाले. पण, एकही गुन्हा अद्याप मागे घेतला नाही. तुम्हीच 30 दिवसांची मुदत मागितली होती. आम्ही 40 दिवसांची दिली. आता वेळ देता येणार नाही, असे जरांगे-पाटील म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि संदिपान भुमरे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेत समजून घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र जरांगे-पाटील हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. परभणीत शुक्रवारी झालेल्या सभेत त्यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.