Manoj Jarange Patil  Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील उपचारानंतर पुन्हा अंतरवालीत दाखल; आता साखळी उपोषणात होणार सहभागी

Ganesh Thombare

Chhatrapati Sambhaji Nagar : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार घेतल्यानंतर पुन्हा अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी अंतरवाली सराटीकडे परत जाताना ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तब्बल सतरा दिवस मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं. यावेळी जरांगे पाटलांनी राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. २९ ऑगस्ट ते १४ सप्टेंबरपर्यंत अंतरवालीत त्यांनी उपोषण केलं. मात्र, मध्येच पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्च केल्याने हे आंदोलन चिघळले होते. त्यानंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटले होते.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे २०१४ पासून आंदोलनं करत आहेत. पण त्यांच्या याआधीच्या आंदोलनाची जास्त चर्चा झाली नव्हती. मात्र, यावेळी अंतरवाली सराटीत १७ दिवसांच्या उपोषणामुळे मनोज जरांगे हे राज्यात चर्चेत आले.

एवढंच नाही तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह जरांगे पाटलांच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळ कामाला लागलं होतं. त्यानंतर उपोषणाच्या सतराव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फळांचा ज्यूस घेत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं.

१७ दिवसांच्या उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उपचार पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर ते अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत. आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या साखळी उपोषणात मनोज जरांगे पाटील सहभागी होणार आहेत.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT