धनंजय मुंडे यांच्या “चष्मा घेऊन टाक” वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी काळा गॉगल लावून घोडेस्वारी करत स्टाइलिश पलटवार केला.
या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर जरांगे पाटील ट्रेंडमध्ये असून समर्थकांनी त्यांचा हा प्रतिसाद ‘स्मार्ट टोला’ म्हटला आहे.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे.
Marathwada Political News : आधी माझा डोळा काढला म्हणून टीका केली, पण माझा डोळा आॅपरेशनमुळे फडफडतोय, तो अजून फडफडू नये एवढचं. आता मला परळीचा चष्मेवाला म्हणून लागला, आवडला असेल तर घेऊन टाक! पण तूला तो शोभेल का नाही? माहित नाही, अशा शब्दात आमदार धनंजय मुंडे यांनी बीडच्या महाएल्गार सभेतून मराठा आरभण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्ला चढवला होता. याची राज्यभरात चर्चा होत असताना या टीकेनंतर जरांगे पाटील यांच्या काळ्या गाॅगलमधील लूकचे व्हिडिओ सध्या धुमाकूळ घालत आहेत.
चष्मा घेऊन टाक म्हणणाऱ्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर जरांगे पाटील यांनी गळ्यात भगवा रूमाल, डोळ्यावर काळा गाॅगल आणि घोडेस्वारी करत प्रत्युत्तर दिले आहे. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा हा नवा अवतार पहायला मिळाला. पांढरे शुभ्र कपडे, कपाळावर गुलाल-कुंकू, गळ्यात भगवा आणि डोळ्यावर काळा चष्मा लावून जरांगे पाटील यांनी घोडेस्वारीचा आनंद लुटला. नेमकं काल धनंजय मुंडे यांनी चष्म्यावरून जरांगे यांच्यावर टीका केली आणि आज लगेच काळा चष्मा घालून जरांगे यांनी टायमिंग साधल्याचे बोलले जात आहे.
राज्यात मराठा आरक्षणाचा लढा, ओबीसी विरुद्ध मराठा भडकलेला संघर्ष, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणापासून मनोज जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे हे आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आल्यानंतर वाढत्या राजकीय दबावातून धनंजय मुंडे यांचे मंत्री पद गेले. यात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची मुख्य भूमिका होती.
परंतु अडीच महिने मुंडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली नव्हती. भगवान भक्ती गडावर झालेल्या दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदा जाहीरपणे मराठा आरक्षणावर आणि अप्रत्यक्षरित्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर काल बीडमध्ये झालेल्या ओबीसींच्या महाएल्गार सभेत तर मुंडेंची तोफ जरांगे पाटील यांच्यावर बेछूट चालली. जरांगे पाटील यांनी केलेल्या प्रत्येक टीका आणि आरापोवर मुंडे यांनी जरांगे यांना फैलावर घेतले.
परळीचा चष्मेवाला, परळीचं टोळकं, रक्ताने माखलेले हात अशा भाषेत जरांगे यांनी सातत्याने धनंजय मुंडे यांना डिवचले होते. त्याची सव्याज बीडच्या सभेत धनंजय मुंडे यांनी परतफेड केल्याचे बोलले जाते. मनोज जरांगे पाटील यांनी कालचा मेळावा हा ओबीसींचा नाही, तर एका जातीच्या टोळक्यांचा होता अशी टीका केली होती. धनंजय मुंडे यांनी माझा चष्मा आवडला असले तर घेऊन टाक, या टोल्यावरही मी कशाला तुझा चष्मा घेऊ, मला काय करायचा, तुझा तुझ्यापाशीच ठीव, असा पलटवार जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना केला होता.
मात्र ही टीका जिव्हारी लागल्याने जरांगे पाटील यांनी आज काळा चष्मा घालून घोडेस्वारी करत धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा डिवचल्याचे दिसून आले. मराठा आरक्षणात खोडा घालणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आपण दिल्लीत धडकणार आहोत, असे सांगत जरांगे यांनी आरक्षणाचा लढा आता देशाच्या राजधानीत घेऊन जाणार असल्याचे सांगीतले.
1. धनंजय मुंडेंनी जरांगे पाटील यांच्याबद्दल काय वक्तव्य केलं होतं?
→ मुंडेंनी “जरांगे पाटील यांनी चष्मा घेऊन टाकावा” असा सल्ला दिला होता, जो नंतर चर्चेचा विषय ठरला.
2. जरांगे पाटील यांनी कसा पलटवार केला?
→ त्यांनी काळा गॉगल लावून घोडेस्वारी करत मुंडेंना अप्रत्यक्ष टोला लगावला.
3. सोशल मीडियावर या प्रकरणावर काय प्रतिक्रिया आल्या?
→ समर्थकांनी जरांगे पाटील यांचा स्टायलिश प्रतिसाद कौतुकास्पद म्हटला, तर विरोधकांनी त्यावर टीका केली.
4. या घटनेचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
→ मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी येऊन बीड व मराठवाडा भागात तणाव वाढण्याची शक्यता आहे.
5. धनंजय मुंडेंनी या पलटवारावर प्रतिक्रिया दिली का?
→ अद्याप मुंडेंकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर प्रतिउत्तर दिलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.