Manoj Jarange Patil  Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil PC : जरागेंचा एल्गार : सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम ; अन्यथा 25 तारखेपासून पुन्हा उपोषण

Maratha Reservation Latest News : मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार आहेत.

Amol Jaybhaye

Manoj Jarange Patil Press Conference : मराठ्यांनी विश्वविक्रम केला आहे. तो कुणी मोडू शकत नाही, मराठ्यांनी दंड थोपटायला आजपासून सुरुवात केली आहे. डर जरुरी है, मराठ्याचा डर आहे. सरकारने 24 तारखेपर्यंत आरक्षण द्यावे, अन्यथा त्यांना पुढील आंदोलन झेपणारही नाही आणि पेलणारही नाही. राज्य सरकारने जर 24 तारखेच्या आत मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) निर्णय घेतला नाही, तर 25 तारखेपासून मी आमरण उपोषण पुन्हा सुरू करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारमधले सर्व सांगतात त्यांचे नाव सांगितले तर ते पुढे बोलणार नाही, आम्हाला हळूच सांगतात. हल्ला कोणी करायला सांगितले ते शोधायचे आहे. 15 दिवस थांबा मी शोधून काढणार असल्याचेही जरांगे यांनी सांगितले. आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, अशी मराठा समाजाला अपेक्षा, आहे सर्व पक्षांनी ठराव घेतला आहे. सर्व मराठे सज्ज आहेत.

24 तारखेपासून सुरू होणाऱ्या उपोषणात अन्न पाणी औषधोपचार न घेता कठोर आंदोलन करण्यात येणार आहे. आमच्या गावात एकाही राजकीय नेत्यांला येऊ दिले जाणार नाही. आरक्षण घेऊनच गावात यायचे नाहीतर तुम्हाला गावात येऊ देणार नाही. महाराष्ट्रभर साखळी उपोषण सुरू होणार आहे. 28 तारखेपासून त्या साखळी उपोषणाचे रुपांतर आमरण उपोषणात होणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

25 च्या नंतरचे आंदोलन सरकारला पेलणार नाही. 25 तारखरेला पुन्हा पुढील दिशा स्पष्ट केली जाईल. 28पासून त्यांचे साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात केले जाणार, त्याची सर्व तयारी केली आहे. प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात मराठा समाज एकत्र येऊन कँडल मार्च काढणार आहे. पुढील आंदोलन सरकारला पेलणार नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT