Manoj Jarange News : तात्पुरती मलमपट्टी नको, कायमचा उपचार करा; अन्यथा, पेलणार नाही असं आंदोलन करू!

Maratha Reservation : , मराठा आरक्षणाबाबत उद्या अहवाल करा, परवा आरक्षण द्या !
Manoj Jarange
Manoj Jarange Sarkarnama
Published on
Updated on

Jalna Maratha Protest : मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारला दिलेल्या मुदतीला दोन दिवस बाकी आहे. जरागेंनी आंदोलन अधिक तीव्र केले आहे. आज ते आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार आहेत. अशातच आज सरकारने प्रसिद्ध केलेल्या जाहीरातीत EWS अंतर्गत मराठा समाजातील किती विद्यार्थ्यांना प्रवेश दिला, यांची माहिती दिली आहे. यावरून जरांगेंनी सरकारवर टीका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange
Eknath Pawar Resigns : भाजपला झटका; जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी माजी शहराध्यक्षांचा राजीनामा

"सरकारने सकाळी EWSचं नवीन पिल्लू आणलं, पण EWS हे सर्वांसाठी आहे, आमच्या भावनांशी खेळू नका," असे जरांगे म्हणाले. "आम्हाला बहाणे सांगू नका. आरक्षणाबाबत आम्हाला कायमचा उपचार करा, तात्पुरती मलमपट्टी नको," असे त्यांनी सांगितले.

EWS अंतर्गत १० टक्के आरक्षणातून विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये ३१ हजार विद्यार्थ्यापैकी ७८ टक्के मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश, तसेच एमपीएससी मार्फत सरकारी सेवेत ६५० उमेदवारांपैकी ८५ टक्के मराठा समाजाच्या उमेदवारांची नियुक्ती केल्याचे म्हटलं आहे.

"सरकारने आता वेळकाढूपणा करू नये, मराठा आरक्षणाबाबत उद्या अहवाल करा, परवा आरक्षण द्या, मनात आणलं तर दोन तासात आरक्षण देता येईल.

तुमच्या हातात दोन दिवस आहेत, मराठ्यांच्या नादी लागू नका. दोन दिवसानंतर सरकारला पेलणार नाही, असं आंदोलन करु," असा इशारा त्यांनी दिला.

Manoj Jarange
Sharad Pawar News : शरद पवारांनी एका वाक्यातच बावनकुळेंचा विषयच संपवला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com