Manoj Jarange Patil Reaction On Death Threat Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : 'माझ्या हत्येचा कट रचनारा नेता कोण ? हे पुराव्यासह जाहीर करणार'! मनोज जरांगेंचा इशारा नेमका कोणाकडे?

Manoj Jarange Patil Receive Death Threat : खुनाचा कट कसा शिजला गेला, हत्या घडवून आणणं किंवा घातपात करणं या सर्व बाबींच्या तपासावर जालन्याचे पोलीस अधीक्षक लक्ष ठेवून आहेत.

Jagdish Pansare

  1. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी हत्येचा कट रचणाऱ्या एका नेत्याचा पर्दाफाश करण्याचा इशारा दिला आहे.

  2. ते पत्रकार परिषद घेऊन त्या नेत्याचे नाव आणि पुरावे सादर करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

  3. या खुलाशामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Death Threat News : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी आणि त्यांच्या हत्येचा कट रचत त्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिल्याची तक्रार स्वतः जरांगे पाटील यांनी केली. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आणि जालना पोलीसांनी बीड जिल्ह्यातील गेवराईमधून दोन संशयितांना ताब्यात घेतले. यावर मनोज जरांगे पाटील यांनी 'माझ्या हत्येचा कट कसा, कोणी शिजवला, यामागे कोण नेता आहे? हे मी पुराव्यासह पत्रकार परिषद घेऊन जाहीर करेल. तू चुकीच्या ठिकाणी खेटलास' असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

मनोज जरांगे पाटील याचा नेमका रोख कोणाकडे? आहे याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे. जीवे मारण्याची धमकी आणि हत्येचा कट, त्यासाठी अडीच कोटींची सुपारी दिली गेल्याची तक्रार स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी जालन्याचे पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन केली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी गेवराईमधून दोन संशयितांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. तपासात तथ्य आढळले तर गुन्हा दाखल केला जाईल, अशी भूमिका पोलीस अधीक्षक बन्सल यांनी घेतली आहे.

दरम्यान, या प्रकारावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त करत कट शिजवणाऱ्यांना उघडं पाडणार असल्याचे म्हटले आहे. अंतरवाली येथे माध्यमांनी जेव्हा जीवे मारण्याची धमकी आणि हत्येच्या कटासाठी अडीच कोटीची सुपारी दिल्याबद्दल विचारले तेव्हा जरांगे पाटील यांनी एका मोठ्या नेत्याकडे उंगली निर्देश केला. कोणी कट शिजवला, कसा शिजवला, कट शिजवणारा मुख्य नेता कोण? याचे सगळे पुरावे घेऊन आपण पत्रकार परिषदेत त्याचे नाव जाहीर करू, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली.

खुनाचा कट कसा शिजला गेला, हत्या घडवून आणणं किंवा घातपात करणं या सर्व बाबींच्या तपासावर जालन्याचे पोलीस अधीक्षक लक्ष ठेवून आहेत. ते खोलवर तपास करणार असल्याचे त्यांनी सांगितले. घातपात किंवा हत्या करायाची हा कट रचल्याची माहिती सत्य असुन हे नाकारता येणार नसुन हा डाव खुप मोठ्या नेत्यांनी शिजवला असल्याचे तपासात निष्पन्न होईल, असा दावाही जरांगे यांनी केला.

कट शिजवणाऱ्या नेत्यांना इशारा देताना 'तु चुकीच्या ठिकाणी खेटलास, तु आतापर्यंत केलेले षडयंत्र,रचलेले कट कोणी भेदले नसले तरी तुझी साखळी आम्ही पुर्णपणे भेदली. उष्टे , खरकटे, कट रचणारे खुप बघितले, कट रचणाऱ्या नेत्याला सरकार सोडणार नाही. मी समाजासाठी रक्त जाळायचीच नाही तर रक्त सांडायची तयारी पण ठेवतो. पण समाजाने शांत राहून संयम पाळावा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी यावेळी केले.

फडणवीस साहेब याकडे गांभीर्याने पाहतील का?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणात निश्चित खोलपर्यंत कारवाई करतील. कट रचणाऱ्या नेत्याला चौकशीला बोलवून सखोल चौकशीचे आदेश देतात का? याकडे किती गांभीर्याने बघतात, लक्ष घालतात याकडे समाज बघत आहे. त्याने परिसीमा गाठली आहे, त्याला किती प्रकरणात सोडायचं? फडणवीस साहेब गंभीर दखल घेऊन चौकशी करतील, आता लांबून नाही तर सखोल चौकशी करतील, असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यावर लक्ष ठेवून आहेत. अजित पवार हे देखील यात लक्ष देतील. या अगोदर मी वेळोवेळी सांगत होतो, खोटे व्हिडिओ, रेकॉर्डिंग करायच्या. काही आमच्यातलेच फोडायचे, हे उद्योग सुरूच होते. माझी जात उंचीवर चाललेली त्यांना बघवत नाही, मग याला आता बदनाम करा आणि नाही होत तर असा कट रचायचा. हत्या, खुन काय? हे पोलीस सिध्द करतील, असे सांगत जरांगे पाटील यांनी काही सूचक इशारे केले आहेत. फडणवीस साहेबांना वाटलं तर उच्चस्तरीय चौकशी लावतील, तसे आदेश ते देतात का? या प्रकरणाला ते किती गांभीर्याने घेतात ते पाहतोय, असेही जरांगे पाटील म्हणाले.

FAQs

  1. प्रश्न: मनोज जरांगे पाटील कोणाचा पर्दाफाश करणार आहेत?
    उत्तर: त्यांनी एका राजकीय नेत्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला असून, त्या नेत्याचे नाव पत्रकार परिषदेत जाहीर करणार आहेत.

  2. प्रश्न: पत्रकार परिषद कधी आणि कुठे होणार आहे?
    उत्तर: मनोज जरांगे पाटील लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत.

  3. प्रश्न: जरांगे पाटील यांच्याकडे कोणते पुरावे आहेत?
    उत्तर: त्यांनी मोबाईल रेकॉर्डिंग, संदेश आणि साक्षीदारांचे निवेदन असल्याचे संकेत दिले आहेत.

  4. प्रश्न: या घटनेवर पोलिसांनी काय कारवाई केली आहे?
    उत्तर: पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.

  5. प्रश्न: या खुलाशाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
    उत्तर: या आरोपांमुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT