Manoj Jarange Patil : जीवे मारण्याची धमकी अन् हत्येचा कट, मनोज जरांगे यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट! दोघे संशयित ताब्यात!

Manoj Jarange Patil receives death threat : स्थानिक गुन्हे शाखेने गेवराईतून अमोल खुणे, दादा गरुड या दोघांना गुरुवारी (ता.सहा) सकाळी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
 Manoj Jarange Patil Receive Death Threat News
Manoj Jarange Patil Receive Death Threat Newssarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल झाली आहे.

  2. या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

  3. हत्येचा कट रचल्याच्या आरोपानंतर मनोज जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ करणार असल्याची माहिती आहे.

Marathwada News : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या हत्येचा कट रचल्याची तक्रार जालना पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी काल मध्यरात्री पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आपल्या हत्येसाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे लेखी तक्रारीत नमूद केले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून पोलीसांनी या तक्रारीवरून बीडमधून दोघांना ताब्यात घेतले आहे.

मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देऊन कट रचल्याची माहिती मिळाल्यानंतर जरांगे पाटील यांनी बुधवारी(ता.पाच) मध्यरात्रीनंतर पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेतली. या संदर्भात तक्रार अर्ज दिल्यानंतर जालना पोलिसांनी बीड जिल्ह्यातील गेवराई परिसरातून दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या दोघांची कसून चौकशी केली जात आहे. तपासात तथ्य आढळून आले तर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे बन्सल यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटील हे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी दोन वर्षापासून आंदोलन करत आहेत. अंतरवाली सराटीतून सुरू झालेले हे आंदोलन एकदा मुंबईच्या वेशीवर तर दुसऱ्यांदा थेट मुंबईत धडकले होते. दरम्यान, अंतरवाली सराटीत आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला आणि गोळीबार प्रकरणानंतर हे आंदोलन देशभरात पोहचले होते. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आणि हैदबाद गॅझेटमधील नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र वाटपाची अंमलबजावणी सरकारने सुरू केली आहे.

 Manoj Jarange Patil Receive Death Threat News
Manoj Jarange Patil : बच्चू कडूंना ताकद देण्यासाठी गेलेले मनोज जरांगे आंदोलकांवरच भडकले; डाव, प्रतिडाव... बरंच बोलले

यानंतर राज्यात पुन्हा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झाला आहे. दसरा मेळाव्यासह जिल्ह्यात व राज्यात केलेल्या दौऱ्यांमधून मनोज जरांगे पाटील अनेक राजकीय नेत्यांवर सडकून टीका केली. यात प्रामुख्याने ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांचा समावेश आहे. यातून अनेकदा वाद आणि दोघांचे समर्थक एकमेकांवर धावून जाण्याचे प्रकार घडले. नुकताच बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा पार पडला.

 Manoj Jarange Patil Receive Death Threat News
Maratha Reservation : ‘समान आडनाव’ असेल तर मिळेल का कुणबी दाखला? मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाची व्याप्ती वाढवली...

या मेळाव्यातून मनोज जरांगे पाटील यांना भुजबळ, मुंडे यांनी टार्गेट केले होते. यावरून वातावरण तापलेले असतानाच आता थेट जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी आणि त्यांच्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दोघांना दिल्याचा दावा केला जात आहे. या दाव्याने मोठी खळबळ उडाली असून स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या संदर्भात तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने गेवराईतून अमोल खुणे, दादा गरुड या दोघांना गुरुवारी (ता.सहा) सकाळी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणाची चौकशी सुरू असून नेमका प्रकार काय आहे? याचा पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांनी त्यांना धमकी देऊन जीवे मारण्याचा कट रचल्या प्रकरणी बुधवारी रात्री उशिरा स्वतः तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जामध्ये दोन संशयितांची नावे होती. त्यानुसार त्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून प्राथमिक तपास सुरू आहे. तपासाअंती काही आढळून आल्यास या प्रकरणात गुन्हा दाखल केला जाईल, असे जालन्याचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले आहे.

FAQs

  1. प्रश्न: मनोज जरांगे पाटील यांना कोणत्या कारणामुळे धमकी मिळाली?
    उत्तर: मराठा आरक्षण आंदोलन आणि त्यांच्या भूमिकेमुळे काही विरोधकांनी धमकी दिल्याचा संशय आहे.

  2. प्रश्न: पोलिसांनी किती जणांना अटक केली आहे?
    उत्तर: दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  3. प्रश्न: मनोज जरांगे पाटील यांची सुरक्षा वाढवली आहे का?
    उत्तर: होय, पोलिसांनी त्यांची सुरक्षा वाढवली आहे.

  4. प्रश्न: प्रकरणाची चौकशी कोण करत आहे?
    उत्तर: स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला असून वरिष्ठ अधिकार्‍यांचे लक्ष या प्रकरणावर आहे.

  5. प्रश्न: धमकीची माहिती कशी उघड झाली?
    उत्तर: जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर तपास सुरू झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com