Devendra Fadnavis, Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : मेहुण्यावर तडीपारीची कारवाई होताच जरांगेंचा CM फडणवीसांना इशारा, म्हणाले, "तर मराठ्यांची पोरं..."

TadiPar Action Maharashtra : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मेहुण्याला चार जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं आहे. वाळू तस्करीसह सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

Jagdish Patil

Jalna News, 09 Feb : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मेहुण्याला चार जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं आहे. वाळू तस्करीसह सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र, मेहुण्यावर कारवाई होताच जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) हल्लाबोल केला आहे. मेहुण्यासह अंतरवाली सराटीतील आंदोलकांना बजावलेल्या तडीपारीच्या नोटीसवरून जरांगेंनी फडणवीसांवर निशाणा साधला. आंदोलन बंद पाडण्यासाठी नातेवाईक आणि कार्यकर्त्यांना तडीपार करणे हे त्यांचंच षडयंत्र असल्याचं जरांगे म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

जालन्यात (Jalna) वाळू माफियांसह अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. त्यानुसार आता 9 आरोपींना जालनासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतून तडीपार करण्यात आलं आहे. तडीपार करण्यात आलेल्या नऊ जणांमध्ये मनोज जरांगे पाटलांचा मेहुणा विलास खेडकर याचा देखील समावेश आहे.

तडीपारीची कारवाई केलेल्यांवर अंतरवाली सराटीच्या आंदोलनात केलेली जाळपोळ, सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल आहे. विलास हरिभाऊ खेडकर, केशव माधव वायभट, संयोग मधुकर सोळुंके, अमोल केशव पंडित, गोरख बबनराव कुरणकर, गजानन गणपत सोळुंके, संदीप सुखदेव लोहकरे, रामदास मसूरराव तौर, वामन मसुरराव तौर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

जरांगे नेमकं काय म्हणाले?

आंदोलकांसह मेहुण्यावर तडीपारीची कारवाई करताच यावर मनोज जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, माझं तोंड बंद करण्यासाठी मुद्दाम माझ्या नातेवाईकांवर आणि कार्यकर्त्यांची नावे तडीपारीच्या यादीत घालण्यात येत आहेत.100 टक्के हे देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र आहे.

मात्र, चुकीचं काम केलं तर माझ्या बापावर जरी केस झाली तरी मी सोडणार नाही. पाहुण्यांचा तर विषय संपला. मात्र, फडणवीसांनी आमच्याशी गद्दारी केली. गुन्हे मागे घेतो म्हणाले आणि आता खोट्या गुन्ह्यात लोकांना अडकवत असल्याचा आरोप जरांगेंनी यावेळी केला. तसंच गोड बोलून आम्हाला अडकवत असाल तर मराठ्यांची पोरं तुम्हाला राज्यात रस्त्याने फिरू देणार नाहीत, असा इशाराही त्यांनी यावेळी फडणवीसांना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT