manoj jarange patil sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : सुट्टी नाही! जरांगेंनी शिंदे सरकारला ‘डेडलाइन’ देत दिली ‘वॉर्निंग’

Akshay Sabale

मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील यांनी पहिल्यांदा बीडमधील नारायणगड येथे दसरा मेळाव्याचं आयोजन केलं होतं. 500 एकरच्या मैदानात तुफान गर्दी जमली होती. "पण, एवढी गर्दी असं वाटलं नव्हतं. गर्दी पाहून समोरच्याचा कार्यक्रम होईल," अशी फटकेबाजी जरांगे-पाटील यांनी केली आहे.

“मराठा समाज कधीच मस्तीत आणि मग्रुरीत वागला नाही. मराठा समाजानं कधीच जातीवाद केला नाही. मग आमच्याच वाट्याला अन्याय का आला? राज्यात अन्यायाविरोधात एक लाट निर्माण झाली आहे. अन्यायाविरोधात तुम्हाला उठाव करावा लागेल,” असा एल्गार जरांगे-पाटील ( Manoj jarange Patil ) यांनी केला आहे.

"मी कचका दाखवतो"

“जर आपल्याला न्याय मिळाला नाही. तर उलथापालथ करावी लागेल. आता यांना मी कचका दाखवतो. राज्यात न्यायासाठी कठोर आंदोलन सुरू आहे. करोडोच्या संख्येने समुदाय न्यायासाठी लढत आहे. जो न्यायासाठी लढतो, त्याच्या बाजूनं न्याय करणारे लोक नाहीत. आम्ही काय केलंय?" असा सवाल जरांगे-पाटील यांनी उपस्थित केला.

आम्ही आरक्षण मागताना धक्का लागत नव्हता का?

“मला चारही बाजूंनी घेरलं आहे. मी तुमच्यात असो किंवा नसो. पण, माझा समाज आणि त्यांची लेकरं संपवू नका. 17 जातींना ओबीसीत घालताना बाकीच्या ओबीसींचा विचार का केला नाही? आम्ही मागत होतो, तेव्हा धक्का लागत होता, आता काय झालं? याबद्दल महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं का? मराठा, शेतकरी, अठरा पगड जातींना एक न्याय द्यायचा आणि दुसऱ्यांना वेगळा न्याय द्यायचा. तुम्ही कितीही झुंजा, कितीही कोटींच्या संख्येने एकत्र या, आम्ही तुमच्या छातीवर बसून आणि नाकावर टिच्चून 17 जातींना आरक्षण दिलं. सरकारनं आपल्याला खुन्नस दिली आहे. त्यामुळे यांना उखडून फेकावं लागणार आहे. सुट्टी नाही. क्षत्रिय मराठ्यांना लढायला शिकवलं आहे. आपल्या डोळ्यांसमोर अन्याय करत असतील, तर उखडून फेकावंच लागेल,” असं इशारा जरांगे-पाटील यांनी दिला आहे.

नाकावर टिच्चून उलथं करणार

“आचारसंहिता लागण्यापूर्वी जनतेच्या सर्व मागण्या मान्य करा. अन्यथा आचारसंहिता लागू करू नका. जर तुम्ही आम्हाला खुन्नस देऊन, अपमान करून, डोळ्यात चटणी टाकून अपमान केला, तर तुमच्या नाकावर टिच्चून तुम्हाला उलथं केल्याशिवाय राहणार नाही,” अशी वॉर्निंग जरांगे-पाटील यांनी दिली आहे.

आनंद घेऊन जा, मला दु:ख द्या...

“नारायगडावरून जाताना फक्त आनंद घेऊ जा. दु:ख माझ्याकडे देऊन जा. दु:ख सांभाळण्याची जबाबदारी माझी आहे. वेळेप्रसंगी मरण पत्करेल. पण, तुमची मान खाली होऊन देणार नाही. मात्र, जे सरकार तुम्हाला संपवण्याचं पाहते, त्याला संपवल्याशिवाय मी मागे हटणार नाही,” असंही जरांगे-पाटील यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT