Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार उभे करायचे की पाडायचे? याचा निर्णय अंतिम झाल्यानंतर आता ज्यांनी ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्यापैकी कोणी अर्ज ठेवायचा आणि कोणी माघार घ्यायची? यावर उद्या (ता.3) अंतरवाली सराटीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले फक्त त्यांनीच उद्या सकाळी सात वाजता अंतरवालीत यावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
कोणीही समर्थक किंवा कार्यकर्त्यांना सोबत आणू नये, अशी अशी सूचना त्यांनी आवर्जून दिली आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी चार नोव्हेंबर शेवटची तारीख आहे. तत्पूर्वी कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार द्यायचा याचा अंतिम निर्णय (Manoj Jarange Patil) मनोज रंगे पाटील उद्या अंतरवाली सराटीत जाहीर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी अर्ज दाखल केलेल्या सगळ्याच उमेदवारांना सकाळी सात वाजता अंतरवाली सराटी येथे येण्याचे आवाहन केले आहे. सायंकाळी पाच वाजता कोणता उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक लढवणार यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली. राज्यात मराठा दलित आणि मुस्लिम हे समीकरण जुळवून आले आहे. त्यामुळे आधी ठरल्याप्रमाणे ज्यांनी ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले त्यांना आजच आपापल्या मतदारसंघात बैठक घेऊन एक नाव ठरवावे, असे आवाहन केले आहे. असे झाल्यास माझे काम उद्या सोपे होईल, दिवस जाणार नाही.
शिवाय तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करा, कोणी लढायचे, कोणी माघार घ्यायची हे अंतरवाली सराटीत झालेल्या याआधीच्या बैठकीत सगळ्यांनी मान्य केले होते. (Maratha Reservation) त्यामुळे आता तो प्रश्न राहिलेला नाही कोणत्या मतदारसंघात लढायचे? कुठे उमेदवार द्यायचा नाही आणि कुठे कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा याची संपूर्ण आखणी आणि तयारी झाली आहे.
उद्या सकाळी सात वाजता ज्यांनी ज्यांनी अर्ज दाखल केले आहेत त्यांनी अंतरवालीत यावे सायंकाळी पाच वाजता या संदर्भातला अंतिम निर्णय जाहीर केला, जाईल असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. राज्यात मराठा, दलित आणि मुस्लिम समाज एकत्र आला आहे. त्यामुळे आम्ही ताकदीने निवडणूक लढणार आणि जिंकणार, असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
मराठा, मुस्लिम, दलित असे समीकरण जुळून आल्यानंतर होणाऱ्या टीकेला जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडे असलेल्या मुस्लिम नेते आणि उमेदवारांची जंत्रीच त्यांनी मांडली. राज्यात दलित, मुस्लिम आणि मराठा समाजाचे मोठे मतदान आहे. त्यामुळे सगळ्यांनी मतदान करून आपले उमेदवार निवडून आणायचे, इथे मेरीट किंवा एरिया असे काही नाही. समाजापुढे सगळे सर्व्हे फेल ठरत असतात, असा टोलाही मनोज जरांगे यांनी यावेळी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.