Maratha Reservation : "एवढा जातीयवाद कशासाठी?" महायुती सरकारच्या 'त्या' निर्णयावरुन जरांगे पाटलांचा संतप्त सवाल

Manoj Jarange Patil : ओबीसींच्या यादीत नव्या 15 जातींचा समावेश करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. शिवाय या जातींचा ओबीसीत समावेश करताना महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
Manoj Jarange Patil, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Manoj Jarange Patil, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Jalna News, 10 Oct : महायुती सरकारने केंद्र सरकारकडे इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसींच्या यादीत नव्या 15 जातींचा समावेश करण्याची मागणी केली आहे. या संबंधित मागासवर्ग आयोगाकडून समावेश करण्यात आलेल्या जातींची यादी केंद्राला सुपूर्द करण्यात आली आहे.

त्यामुळे या जातींचा केंद्राच्या यादीत समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, राज्य शासनाच्या या निर्णयावरून मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.

'या 15 जातींचा ओबीसीत समावेश करताना महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं आहे का? मराठ्यांना आरक्षण देतांना यांना त्रास होतो, एवढा जातीयवाद कशासाठी?' असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला केली आहे.

शिवाय राज्य सरकारने मराठा समाजाकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम त्यांना विधानसभा निवडणुकीत दिसतील असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. तसंच विधानसभेसाठीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशीही मागणी त्यांनी केली होती. मात्र, राज्य सरकारने त्यांची कुठलीही मागणी अद्याप पूर्ण केल्याचं दिसत नाही.

Manoj Jarange Patil, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Kannad Assembly Constituency 2024 : ठाकरेंचा निष्ठावंत आमदार कन्नडची जागा राखेल का ?

तर दुसरीकडे ओबीसींच्या (OBC) यादीत नव्या 15 जाती समाविष्ट करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. सरकारच्या याच निर्णयावरून जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. "ज्या जातींचा ओबीसीत समावेश करत आहात, त्याबाबत महाविकास आघाडीकडून लिहून घेतलंय का?" असा प्रश्न त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी याच मुद्द्यावरून ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.

ते म्हणाले, "ओबीसींचे येवल्याचे नेते आता कुठे गेले, मराठ्यांच्या बाबतीत सरकारचे डोळे गेले आहेत. आता ओबीसी नेते कुठे झोपलेत? येवल्याचा डुप्लिकेट नेता आता कुठे गेला? आता या जातींना विरोध का नाही केला?" असं म्हणत त्यांनी भुजबळांवर टीका केली. तर आता मराठे शहाणे होतील, मराठ्यांचे डोळे उघडणे गरजेचं होतं.

Manoj Jarange Patil, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Top 10 News : महायुती सरकारची अखेरची रेकॉर्डब्रेक मंत्रिमंडळ बैठक; प्रणिती शिंदेंचा फडणवीसांवर पलटवार - वाचा महत्त्वाच्या घडामोडी

सरकारने या जातींना ओबीसीत घेतांना महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं आहे का? हे एकमेकांना लिफ्ट देताहेत. मराठ्यांना आरक्षण देतांना यांना त्रास होतो, एवढा जातीयवाद कशासाठी? असं म्हणत त्यांनी सरकारला धारेवर धरलं. तर मराठ्यांना विचारात न घेता राज्य शासनाने या जातींचा समावेश ओबीसीमध्ये केल्यामुळे मनोज जरांगे पाटील पुढील भूमिका काय घेणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com