Maharashtra Assembly Election 2024 Date : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे आता राज्यात आचारसंहिता लागली आहे.
तर, विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election) कार्यक्रम जाहीर होताच मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. कारण जरांगे यांनी राज्य सरकारला आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठा समाजाच्या (Maratha Reservation) सर्व मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली होती.
मात्र, आता आचारसंहिता लागू झाली तरीही मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाली नाही. त्यामुळेच जरांगे आक्रमक झाले आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच त्यांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) हल्लाबोल केला.
जरांगे म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना बे दखल करण्याचं काम केलं आहे. सरकराकडून मराठ्यांना आशा होती की सरकार आपल्या लेकरांना आरक्षण देईल. पण ती आशा सरकारनं संपवली आहे. शिवाय मराठ्यांची पोर आरक्षणापासून वंचित राहिली पाहिजेत, भिकारी झाली पाहिजेत यासाठी फडणवीसांनी मराठ्यांच्या विरोधात काम केलं." असा आरोप जरांगेंनी (Manoj Jarange Patil) यावेळी केला.
तर मराठ्यांना डिवचण्यासाठीच फडणवीसांनी ओबीसीत इतर जातींचा समावेश केला. त्यांनी त्यांची चाल यशस्वी केली. मात्र आता आपण शेवटच्या थेंबापर्यंत लढायचं. मराठ्यांचे वाटोळे करण्यासाठी फडणवीसांनी सगळे डाव टाकले. पण मतं द्यायची की नाही आता आपल्या हातात आहे. त्यांचा सुफडा साफ केल्याशिवाय आम्ही शांत बसत नाही. मराठ्यांना बाजूला ठेवून हे कधीच सत्तेत येऊ शकत नाहीत, असा इशाराही जरांगे यांनी दिला.
तर, आपण 14 महिने ताकद दाखवली, आता बळ आणि शक्ती दाखवा, आता मतदानात ताकद दाखवा. मराठ्यांनी 100 टक्के मतदान करायचं आहे. समाजाच्या अस्तित्वाची लढाई आहे. समाजाला कधी हरवू देऊ नका. मतदान आपल्या हातात आहे, आपण पक्क ठरवायचं की आता यांची जिरवायची. लोकसभेला जशी ताकद दाखली त्यापेक्षा दुप्पट विधानसभेला दाखवा, असं आवाहन त्यांनी यावेळी मराठा समाजाला केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.