Maharashtra Assembly Election 2024 : टेबल-खुर्च्या अन् बरंच काही.., मतदारांना मिळणार सुविधाच सुविधा, निवडणूक आयोगाची मोठी घोषणा!

Election Commission Press Conference : मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक कधी जाहीर होणार याची उत्सुकता राजकीय पक्षांसह मतदारांना लागली होती. अखेर आज मंगळवारी विधानसभा निवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत जाहीर केली.
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024 Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Elections Announced : मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक कधी जाहीर होणार याची उत्सुकता राजकीय पक्षांसह मतदारांना लागली होती. अखेर आज मंगळवारी (ता.15) विधानसभा निवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाने (Election Commission) पत्रकार परिषद घेत जाहीर केली.

त्यानुसार, महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जाहीर केलं. (Maharashtra assembly elections Date)

यावेळी त्यांनी या निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावताना काही अडचणी येवू नयेत यासाठी आयोगाने पूर्ण खबरदारी घेतल्याचंही सांगितलं. राजीव कुमार (Chief Election Commissioner Rajeev Kumar) म्हणाले, मतदारांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.

Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Election 2024 : मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीचा शंखनाद, 20 नोव्हेंबरला मतदान; 'या' दिवशी लागणार 'युती की आघाडी'चा निकाल

लोकसभा निवडणुकीनंतर (Election) आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामध्ये एकाच मतदान केंद्रावर जास्त मतदारांची नावे असल्यामुळे त्रास झाल्याची तक्रार होती. खास करून या मुंबईतून तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे आता आम्ही खबरदारी घेतली आहे.

Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra election voting date : महाराष्ट्रात पाच टप्प्यांत लोकसभेसाठी होणार मतदान, 'या' आहेत तारखा...

मतदारांसाठी रांगेत टेबल आणि खुर्च्या

त्यानुसार, आता मतदान केंद्रावर जी मतदारांची रांग असते त्या रांगेमध्ये टेबल आणि खुर्च्या ठेवण्यात येणार आहेत. खूप वेळ ऊभं राहिल्याने जो थकवा येतो तो थोडा वेळ बसल्याने जाऊ शकतो. यासाठी ही सुविधा उपलब्ध केल्याचं त्यांनी यावेळी सांहितलं.

तर खासकरून वयस्कर मतदारांसाठी (Voter) ही सुविधा उपलब्ध केल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच वयस्कर मतदारांना ज्याचं वय 85 पेक्षा जास्त आहे त्यांना घरून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध केल्याचंही राजीव कुमार यांनी सांगितलं. शिवाय सर्व मतदारानाची प्रक्रिया पारदर्शक असणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com