Manoj Jarange Rally Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Rally : जरांगेंना अटक करा; गृहविभागाला सदावर्तेंचे पत्र, पोलिस अलर्ट...

Manoj Jarange Rally Antarwali Sarati : सभेला परवानगी देऊ नका, जरांगेंना तातडीने अटक करा.

Mangesh Mahale

Antarwali Sarati : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सरकारला नाकेनऊ आणणारे, मराठ्यांचा आवाज बुलंद करणाच्या हेतूने अंतरवाली सराटीत मनोज जरागेंनी जोरदार तयारी केली आहे. दहा लाखांपेक्षा अधिक आंदोलक सभेला जमणार असल्याची शक्यता आहे. अशातच ऐन सभेच्या दिवशीच वकील गुणरत्ने सदावर्ते यांनी 'जरांगेंना अटक करा,' असे पत्र गृहखात्याला दिल्याने खळबळ उडाली आहे. यावरून राजकारण पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

"मनोज जरांगे पाटलांची अंतरवाली सराटी येथे होणारी सभा हिंसक होईल, सभेला परवानगी देऊ नका, जरागेंना तातडीने अटक करा," अशा मागणीचे पत्र गुणरत्ने सदावर्ते यांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांना व गृहसचिवांना दिले आहे. सदावर्तेंनी साम टीव्हीला याबाबत माहिती दिली आहे.

सदावर्ते हे कुणाचं पिल्लू..

सदावर्तेंच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले, " सभा हिंसक होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुणरत्न सदावर्ते यांना समज द्यावी, असे जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. "गुणरत्न सदावर्ते हे कुणाचं पिल्लू आहे, हे सगळ्यांना माहीत आहे, चेल्यांना मी उत्तर देत नसतो," अशा शब्दांत जरांगेंनी सदावर्तेंना फटकारलं आहे.

भगवे ध्वज, भगव्या टोप्या

लाखो मराठा बांधवांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटलांनी आज जाहीर सभा होत आहे. सभेच्या ठिकाणी गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. शंभर एकर जागेवर ही सभा होत आहे. सभेच्या माध्यमातून परिसरात शाळांना सुटी देण्यात आली आहे. भगवे ध्वज, भगव्या टोप्या घालून 'एक मराठा लाख मराठा', अशा घोषणा देण्यास सुरुवात झाली आहे. जरांगे पाटलांच्या सभेसाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राखीव पोलिस दलाबरोबरच हजारो पोलिस, उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक असा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT