Manoj Jarange Patil Rally : मराठा आरक्षण सभेसाठी 300 किलोमीटरची सायकल वारी, जरांगे-पाटलांकडून कौतुकाची थाप

Antarwali Sarati Maratha Reservation Sabha : मनोज जरांगे-पाटील यांची पुन्हा अंतरवाली सराटीमध्ये विराट सभा...
Manoj Jarange Patil Rally
Manoj Jarange Patil RallySarkarnama
Published on
Updated on

Mangalwedha News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विनंतीला मान देऊन मराठा आरक्षणासाठी आमरण आंदोलन पुकारलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले. या घटनेला 14 ऑक्टोबरला एक महिना पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील पुन्हा अंतरवाली सराटीमध्ये विराट सभा घेत आहेत. या सभेसाठी सकल मराठा समाजाची अंतरवली सराटीमध्ये गर्दी होऊ लागली आहे.

मनोज जरांगे पाटलांच्या(Manoj Jarange Patil) सभेसाठी मंगळवेढ्याहून अंतरवाली सराटी येथे चक्क 300 किलोमीटरची सायकल वारी केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रा. विनायक कलुबर्मे व सिद्धेश्वर डोंगरे यांनी ही सायकलवारी केली आहे. त्यांच्या पाठीवर थेट आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी कौतुकाची थाप दिली. या विराट सभेस एवढ्या लांबून सायकलवर येण्याचा मान मात्र तुम्हा दोघांनी मिळवल्याचे कौतुकोद्गार काढले आहे.

Manoj Jarange Patil Rally
Manoj Jarange Patil Rally : अंतरवाली सराटीच्या जरांगे पाटलांच्या सभेत घुमणार खेडच्या 'गुड्डू'चा आवाज !

सकल मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात(Maratha Reservation) राज्यभर आंदोलन झाले. अंतरवाली सराटी येथे पोलिसांकडून झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी सहा दिवसांत वेगवेगळ्या माध्यमातून केलेल्या आंदोलनातून राज्य सरकारचा निषेध करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मराठा समाजाची तीव्रता लक्षात घेता मनोज जरांगे-पाटील हे 5 ऑक्टोबर रोजी मंगळवेढा दौऱ्यावर येऊन गेले.

या सभेला तब्बल साडेतीन तास उशिरा येऊनदेखील मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पाठिंबा दिला. ऑक्टोबर महिन्यातील पेरणीची उष्णता असतानादेखील समाजासाठी आपलाही काही तरी त्याग असावा या ध्येयाने झपाटून सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, येडशी, येरमाळा, बीड, गेवराई, शहागड मार्गे दररोज १०० ते ११० किमीचा प्रवास करीत ते सभेस्थळी दाखल झाले.

मराठा समाजाला ओबीसी(OBC) प्रवर्गातून ५० टक्क्यांच्या आत आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी उभ्या केलेल्या लढ्यात प्रा. विनायक कलुबर्मे व सिद्धेश्वर डोंगरे यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत सहभाग नोंदविला.

मंगळवेढा येथील प्रा. विनायक कलुबर्मे म्हणाले, सायकलवरून जात असताना वाटेत अनेक ठिकाणी मराठा बांधवांनी आमचे जंगी स्वागत करून सहकार्य केले. आरक्षण न मिळाल्यामुळे मराठा समाजाचे किती नुकसान झाले आहे, याची जाणीव आता झाली. त्यामुळे व्यवसाय बंद करून आर्थिक नुकसान करून घेण्यापेक्षा राज्यकर्त्यांना ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. ही भावना या सायकलवारीच्या दरम्यान लोकांनी बोलून दाखवली.

(Edited By Deepak Kulkarni)

Manoj Jarange Patil Rally
Police Inspector Promotion: राज्यातील 104 पोलिस निरीक्षकांना दिवाळीआधीच मोठं 'गिफ्ट'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com