Maratha Reservation : अंतरवाली सराटी येथील आजच्या सभेने गर्दीचे आतापर्यंतचे सगळे उच्चांक मोडले. सभेआधी राज्याचा दौरा करून मनोज जरांगे यांनी आजच्या सभेला येण्याचे मराठा समाजाला आवाहन केले आणि अंतरवालीपासून चारही बाजूंचे रस्ते गर्दी आणि वाहनांनी खचून भरले. (Manoj Jarange Rally) चाळीसी ओलांडलेल्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या हाकेला मिळालेला प्रतिसाद आश्चर्यचकित करणारा होता.
मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) लढा उभारत राजकारण्यांना अंगावर घेत निर्भीडपणे लढणारे जरांगे पाटील एक बाप म्हणून अतिशय हळवे असल्याचे दिसून आले. रखरखत्या उन्हात लाखोंच्या संख्येने उपस्थितीत सभेला जरांगे संबोधित करत होते. (Jalna) राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला समाज कानात तेल ओतून जरांगे यांचे विचार ऐकत होता. या ऐतिहासिक सभेचे साक्षीदार मनोज जरांगे यांचे कुटुंबही ठरले.
मनोज जरांगे यांची कन्या त्यांच्यासारखीच कणखर विचारांची आणि वक्तृत्वात सरस असल्याचे दिसून आले होते. (Maharashtra) रखरखत्या उन्हात बापाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी बसलेल्या लेकीला अचानक चक्कर आली आणि ती खाली कोसळली. मुलीची ही अवस्था पाहून कणखर बापाचे काळीज हलले. जरांगे यांनी मुलीकडे धाव घेत तिला जवळ घेतले, पाणी पाजले, हातातल्या पेपरने वारं घातलं.
समोर उपस्थितीत लाखोंचा समुदाय आणि कुशीत चक्कर येऊन पडलेली लेक या प्रसंगाला तोंड देताना जरांगे यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले, `पण आलो तर तुमचा, नाही तर समाजाचा`, अशी भीष्म प्रतिज्ञा घेतलेल्या मनोज जरांगे यांनी क्षणात स्वतःला सावरले आणि मराठा आरक्षणासाठी पुन्हा व्यासपीठावर उभे ठाकले. जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यात त्यांना कुटुंबाची खंबीर साथ मिळत आहे.
या जोरावरच जरांगे आरक्षणाचा लढा नेटाने पुढे नेत आहेत, राज्यातील राजकारण्यांना अंगावर घेत आहेत. जरांगे यांची वृद्ध आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी या सगळ्यांच्या खंबीर पाठिंब्यावर जरांगे समाजाला आरक्षण देऊनच थांबतील. तसा शब्दच त्यांनी मराठा समाजाला दिला आहे. आजच्या सभेत जरांगे यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी त्यांच्या आईने उपस्थित समाजाला दोन्ही हात जोडून अभिवादन केले. आपल्या लेकाच्या एका हाकेवर लाखोंच्या संख्येने एकत्र आलेल्या समाजाबद्दलची कृतज्ञता त्यांच्या अभिवादनातून जाणवत होती.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.