Manoj Jarange, Chhagan Bhujbal Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal : विधानसभेत छगन भुजबळांना निवडूनच देणार नाही; मनोज जरांगे नेमके काय म्हणाले?

Maratha Reservation Vs OBC : भुजबळांचे ऐकून सरकारने ओबीसींचे काही नेते आपल्या विरोधात उभे केले आहेत. आपण मात्र एक इंचही मागे सरायचे नाही.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : मराठा आरक्षणाला मंत्री छगन भुजबळ खोडा घालत असल्याचा आरोप आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. आता लोक माझेही ऐकणार नाहीत, असे म्हणत मनोज जरांगेंनी भुजबळांना गर्भित इशारा दिला आहे.

तुम्ही मराठ्यांच्या जीवावर निवडून आलेले आहात. आता सावध राहा. आता लोकं म्हणतात जरांगे तुम्ही निवडून द्या म्हटले तरी आम्ही निवडून देणार नाही, असा अप्रत्यक्षपणे इशाराच जरांगेंनी छगन भुजबळांना दिला आहे.

परभणीत शांतता रॅलीत जरांगे पाटील Manoj Jarange यांनी भुजबळांसह राज्य सरकारवर हल्ला बोल केला. ते म्हणाले, भुजबळांचे ऐकून सरकारने ओबीसींचे काही नेते आपल्या विरोधात उभे केले आहेत. आपण मात्र एक इंचही मागे सरायचे नाही. हक्काचे आरक्षण असूनही मोठा विरोध होत आहे, तर मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही तर ते समाजाला किती ताकदीने उसवतील, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

हक्काचे आरक्षण मिळाले नसल्याने समाजाचे मोठे नुकसान झाल्याची खंत जरांगेंनी व्यक्त केली. लोकसभेत तुमचे एक-दोन जागा पडल्या तर तुम्हाला वेदना होतात. इकडे मराठा समाजातील कितीतरी युवकांचे आयुष्य बरबाद झाले, मग आम्हाला किती वेदना होत असतील? सरकारला मराठ्यांच्या वेदनांची जाण नाही. आता अंत पाहू नका, असा इशाराच जरांगे पाटलांनी दिला.

जरांगे पाटील बोलत असतानाच गर्दीत गोंधळ सुरू झाला. त्यावर मनोज जरांगे म्हणाले, सर्वांच्या इच्छा छगन भुजबळांप्रमाणे Chhagan Bhujbal पूर्ण होत नाहीत. ते सरकारला ओबीसींच्या मतांची भीती दाखवत होते. आता मराठ्यांच्या मतांची त्यांना किंमत समजली आहे. ते आता मराठ्यांच्या नादी लागत नाहीत.

ते म्हणत होते, की मला कायद्याचा अभ्यास नाही. गावठी आहे. आता राज्यात त्यांची कशी तारांबळ उडाली. त्यांचा अभ्यास असून ते तुरुंगात कशाला गेले होते, असा टोलाही जरांगेंनी हाणला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT