Manoj Jarange : विधानसभा निवडणूक लढवण्याची वेळ आली तर..; मनोज जरांगेंनी सांगितला 'प्लॅन'

Maratha Reservation Shantata Rally : हिंगोलीच्या दौऱ्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची परभणीत शांतता रॅली पार पडली. यावेळी परभणीकरांनी त्यांचे जंगी स्वागत केले.
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : लोकसभेच्या फटक्यानंतर सावध झालेल्या सरकारने मराठा आरक्षणातील सगेसोऱ्यांच्या मागणीवर धावाधाव सुरू केली आहे. आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली महिन्याची मुदत 13 जुलैला संपत आहे.

या मुदतीत सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर विधानसभेला 288 उमेदवार लढवण्याचा इशाराच दिला. यात सर्व जाती धर्मांच्या उमेदवारांचा सहभाग असेल, असेही आता जरांगेंनी स्पष्ट केले.

परभणीत शांतता रॅलीसाठी आलेल्या जरांगेंनी Manoj Jarange प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विधानसभा निवडणुकीबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यावर जरांगे म्हणाले, निवडणुकीत उतरण्याची वेळ आली तर राज्यात 288 उमेदवार देणार. त्यात सर्व जातींच्या उमेदवारांचा सहभाग असणार आहे, असे स्पष्ट केले.

आताच्या सरकारने दोन उपमुख्यमंत्री देण्याची प्रथा पाडली. त्यानुसार आम्हीही सर्व समाजाचे 7-8 उपमुख्यमंत्री देणार आहोत. सर्व जाती धर्माचे लोक राजकारणाच्या प्रवाहात आले तर ते आपापल्या जातींना न्याय देतील. त्यामुळे राज्यातील जातीवाद बंद होईल. मुस्लिम, दलित, धनगर, रजपूत आदी सर्व जातींचे उपमुख्यमंत्री करण्यात येतील, असा शब्दही जरांगे पाटलांनी यावेळी दिला.

Manoj Jarange
Worli Hit And Run Case : वरळी अपघातातील घटनाक्रम उलगडला; पोलिसांच्या हाती मोठी माहिती

एकीकडे 288 उमेदवार देण्याची भाषा करणाऱ्या जरांगेंनी आपल्याला राजकारणात जायचे नाही, असेही स्पष्ट केले. ते म्हणाले, राजकारण आपली वाट नाही. माझा जन चळवळीवर जास्त विश्वास आहे. या चळवळीमुळेच माझ्या समाजाला खूप काही मिळाले आहे. आज 57 लाख नोंदी सापडल्या आहेत.

जरांगेंनी दीड कोटी लोकांना आरक्षणाचा Maratha Reservation लाभ मिळला असल्याचे सांगितले. सरकारला मिळालेल्या 54 लाख नोंदी खऱ्या की खोट्या याबाबत निवेदनाद्वारे विचारणा केली होती. त्यावर सरकारने दिलेल्या अभिप्रायानुसार 54 नाही तर 57 लाख नोंदी सापडल्याचे प्रोसेडिंग बूकवर असल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार मराठा समाजातील सुमारे दीड कोटी लोक आरक्षणात गेले आहेत, असा दावाही जरांगे पाटील यांनी केला.

हिंगोलीच्या दौऱ्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची परभणीत शांतता रॅली पार पडली. यावेळी परभणीकरांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

Manoj Jarange
Constitution Article 361 : राज्यपालांकडून लैंगिक शोषण? कलम 361 नं वाचवलं, महिलेनं का दिलं सुप्रीम कोर्टात आव्हान?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com