Manoj Jarange Patil, Pankaja Munde, Dhananjay Munde Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Vs Dhananjay Munde : मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना इशारा; आता कसा निवडून येतो तेच बघतो...

Maratha Reservation : लोकसभेच्या निकालानंतर बीडमधील काही गावांतील मराठा समाजातील लोकांना मारहाण करण्यात आली आहे. यावर जिल्ह्यातील नेते काही बोलताना दिसत नाही.

Sunil Balasaheb Dhumal

Beed Politics : पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील काही गावांत मराठ्यांना त्रास देणे सुरू झाल्याचा आरोप आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्रास झाला तरी काही महिने शांत रहा करा, असे आवाहन त्यांनी केले. चिल्लर लोकांच्या या माकड चाळ्याचा परिणाम चांगल्या नेत्यांना भोगावा लागतो. जे लोक मराठ्यांना त्रास देतात त्यांना विधानसभेत पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही नाव न घेता मंत्री धनंजय मुंडे यांना जरांगेंनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि राज्यात पुन्हा मराठा आंदोलन Maratha Reservation पेटण्याची शक्यता आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे त्यांनी शनिवारपासून पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी मुंडे धनंजय मुंडेवर सडकून टीका केली. ते म्हणाले, लोकसभेच्या निकालानंतर बीडमधील काही गावांतील मराठा समाजातील लोकांना मारहाण करण्यात आली आहे. यावर जिल्ह्यातील नेते काही बोलताना दिसत नाही. त्यामुळे अशा प्रकारांना त्यांची मूकसमंतीची शंकाही त्यांनी व्यक्त केली.

निवडणूक म्हटले की जय-पराजय आलाच. तो मोठ्या मनाने स्वीकारावा लागतो. प्रत्येकवेळी तुम्हीच निवडून यावे, असे काही आहे का? निवडणुकीत याला पाडा आणि त्याला निवडा असे कुठेही बोललो नाही. आता गोरगरीब मराठ्यांना त्रास देणे सुरू आहे. ही मस्ती आहे का.. याबाबत गृहमंत्री आणि बीडच्या एसपींना सांगितले आहे. तसेच मराठ्यांनाही शांततेचे आवाहन केले आहे. मात्र ते नेते त्यांच्या लोकांना काही बोलताना दिसत नाहीत. याचा अर्थ काय? असाही प्रश्न जरांगेंनी Manoj Jarange उपस्थित केला आहे.

बीडमधील दोन समजात तेढ निर्माण करण्यास सरकार नाही तर नेते खतपाणी घालत असल्याचा आरोपही जरांगेंनी केला. धनंजय मुंडे Dhananjay Munde यांचे नाव न घेता जरांगे म्हणाले, कुणचा विजय तर कुणाचा पराजय होतच असतो. मात्र मराठ्यांनीच पाडलंय की काय, असा संशय घेऊन लोकांना त्रास देणे चुकीचे आहे. आता लागलेला निकाल बदलत नसतो. तो मान्य करावा लागतो. आता विधानसभा निवडणुका आल्या आहेत. त्यात मराठ्यांना ज्या जातीचे लोक त्रास देतील, आम्ही त्या जातीचा नेता पाडणार. वेळ प्रसंगी उमेदवार देणार नाही, पण त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार, असा दमच जरागेंनी दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT