Political News : लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, 'सगेसोयरे'वर सरकारने निर्णय न घेतल्यास विधानसभेच्या Assembly Election 288 जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्रात आपले सरकार आले ते कॅबिनेट कसे असेल याची माहिती देखील जरांगे पाटील यांनी.
288 उमेदवार निवडणुकीत उभे केल्यानंतर मुख्यमंत्री मनोज जरांगे Manoj Jarange Patil होणार का? या प्रश्नावर आपण मुख्यमंत्री होणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. मला मुख्यमंत्री होण्याच्या लफड्यात पडायचे नाही. राज्यात सात ते आठ उपमुख्यमंत्री करणार तसेच शेतकऱ्यांना मंत्रीपद देणार, असे जरांगे पाटील म्हणाले.
सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेत निवडणूक Election लढणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. महाराष्ट्रात लोकसभेसाठी वारंवार येणाऱ्या मोदींना विधानसभेच्या वेळी महाराष्ट्र एक झाला तर गोधड्या घेऊन यावे लागणार आहे. केवळ चार ते पाच नेत्यांमुळे मोदी साहेबांवर ही वेळ येणार असल्याचा टोला देखील जरांगे पाटील यांनी लगावला.
नारायण गडावर आयोजित करण्यात आलेली सभा मनोज जरांगे यांनी स्थगित केली होती. ती रद्द करण्याचे कारण देखील जरांगे पाटील यांनी दिले आहे. नारायण गडावर काहीही तयारी नव्हती. तसेच तेथे पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने सभा स्थगित केल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.