Lok Sabha Election 2024: उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावावरुन बोचरी टीका केली आहे. एका सभेत बोलताना त्यांनी फडणवीसांचा फडतुणवीस असा उल्लेख केला. त्यांच्या याच टीकेवर आता मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) मानसिक संतुलन ढासळलं आहे, मानसिक वैफल्यातून ते अशी वक्तव्य करत आहेत. मात्र, त्यांनी हे विसरू नये की, त्यांच्या नावाचाही अपभ्रंश होऊ शकतो. परंतु, आमच्यावर संस्कार आहेत अन्यथा आम्ही उठाबशा कशा काढायच्या हे सांगू शकतो, असा टोला शेलारांनी लगावला.
ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ (Ayodhya Poul) यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. शिवाय या प्रकरणात पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनाच मारहाण केल्याचा आरोप देखील ठाकरे गटाने केला आहे. याच सर्व पार्श्वभुमीवर बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पोलिसांसह फडणवीसांवर हल्लाबोल केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या प्रकरणावर बोलताना ठाकरे म्हणाले, "मला त्या सर्व पोलिसांची नावे पाहिजेत, पोलिसांना मी सांगोत तुम्ही भाजप किंवा फडतुणवीस, नाही फडणवीसचे नोकर नाही तर तुम्ही जनतेचे सेवक आहात, मित्र आहात. हे सरकार जातंय, नक्कीच उद्या आमचं सरकार आल्यावर तुमचं काय करायचं हे आम्ही बघू, हा माझा पोलिसांना जाहीर इशारा आहे. तसंच लोकशाही आणि जनतेसमोर तुमची मस्ती चालू देणार नाही." अशा शब्दात ठाकरेंनी हल्लाबोल केला.
याच सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी बोगस मतदान होईल, अशी भीती व्यक्त केली होती. यावर बोलताना शेलार (Ashish Shelar) म्हणाले, "एवढा पळपुटा माणूस पाहिला नाही, आधी ईव्हीएम, मग मतदानाची टक्केवारी आता बोटाच्या शाईवर बोलतायत. पराभव दिसू लागलाय म्हणून बेछूट आरोप करत आहेत."
यावेळी शेलार यांनी महाविकास आघाडी म्हणजे भ्रम निर्माण करणारी फॅक्ट्री आहे, असं वक्तव्य केलं. ते म्हणाले, भ्रम निर्माण कोण करत आहे? पूर्ण निवडणुकीत भ्रम निर्माण करण्याची फॅक्ट्री महाविकास आघाडीची आहे. आरक्षण बदलणार असं मोदींनी म्हटलं का? तसं आमच्या जाहीरनाम्यातही नाही. मग हे भ्रम उद्धव ठाकरे की शरद पवार (Sharad Pawar) पसरवतायत? असा सवाल शेलारांनी उपस्थित केला. तसंच उद्धव ठाकरे काँग्रेसच्या जाहीरनाम्याला पाठिंबा देत आहेत. म्हणजे त्यांना माओवादी जाहीरनामा मान्य आहे, परंतु जनता हे माफ करणार नसल्याचंही शेलार म्हणाले.
(Edited By Jagdish Patil)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.