Manoj Jarange Patil News Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil News : मी खरंच बारावीपर्यंतच शिकलोय का ? याचा अनेकजण शोध घेताहेत...

Maratha Reservation News : माझे पुस्तकी शिक्षण जरी कमी असले, तरी मी वास्तव आणि समाज चांगल्या पद्धतीने वाचला आहे.

Jagdish Pansare

Marathwada Political News : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात असलेले साडेतीन हजार लोकसंख्येचे अंतरवाली सराटी हे गाव सध्या देशभरात गाजतंय. ४२ वर्षांच्या काडीमोडी शरीरयष्टी असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनामुळे हे गाव आता जगाच्या नकाशावर शोधलं जातंय.

जेमतेम बारावी शिकलेल्या मनोज जरांगे यांना एवढा पाठिंबा, त्यांच्या एका हाकेवर लाखो लोक जमा कसे होतात? एखाद्या पदवी, पदव्युत्तर किंवा कायदे तज्ज्ञालाही गप्प बसवणारे ज्ञान त्यांना कुठून आले? याबद्दल सध्या मोठी चर्चा होताना दिसते आहे.

मराठा आरक्षणासारखा किचकट विषय, त्यावर कायद्याच्या पुस्तकाचा अभ्यास करून प्रश्न विचारणाऱ्यांना जरांगे आपल्या ग्रामीण भाषेतून उत्तर देत गप्प करतात. (Marathwada) हे कसे शक्य आहे? जरांगे पाटील खरंच बारावीपर्यंतच शिकले आहेत? की मग त्यांचे उच्चशिक्षणही झाले आहे, अशा शंकाही उपस्थितीत केल्या जात आहेत.

यावर मनोज जरांगे पाटील यांनीच खुलासा केला आहे. (Jalna) बारावी शिकलेला माणूस त्याला मराठा, धनगर आरक्षण, कुणबी जातीच्या प्रमाणपत्रासाठीचा प्रवास, पुरावे, नोंदी या सगळ्याचा अभ्यास कसा?

खरंच हा माणूस बारावीपर्यंतच शिकला आहे का? याचा शोध अनेक राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते घेत आहेत, अशी माहिती स्वतः जरांगे यांनीच `सकाळ`शी साधलेल्या विशेष संवादात दिली. लोक पुस्तकं वाचतात, कायद्याचा अभ्यास करतात, पण मी समाज वाचला आहे. (Maharashtra) मराठा समाजाचे प्रश्न समजून घेण्यासाठी मी प्रत्येक घरात, कुटुंबात आणि सगळ्या वयोगटाच्या लोकांशी त्यांच्याच मुलगा, भाऊ म्हणून बोललो आहे.

समाजाच्या भल्यासाठी मी लढा देतोय हा विश्वास मी लोकांना देऊ शकलो, त्यामुळेच आज लाखो लोक या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर एकत्र आलेले दिसतात. कुठल्याही सामाजिक लढ्याचे नेतृत्व जेव्हा सामान्यांच्या हाती जाते, तेव्हा ते आंदोलन सत्ता आणि पैशाच्या जोरावर दडपता येत नाही. अनेक नेत्यांनी असे प्रयत्न केले, पण गोरगरीब, शिक्षण, नोकरीसाठी वणवण भटकणारा, ज्याला खऱ्या अर्थाने आरक्षणाची गरज आहे, तो प्रत्येक सामान्य माणूस आरक्षणाच्या या लढ्यात उतरला आहे.

त्यामुळे माझे पुस्तकी शिक्षण जरी कमी असले, तरी मी वास्तव आणि समाज चांगल्या पद्धतीने वाचला आहे. त्यामुळे मराठा आरक्षण कसे मिळू शकते, मिळवायचे हे मी ठामपणे सांगू शकतो. इंग्रजी मला समजत नाही, ग्रामीण मराठी भाषेत मी जे बोलतो ते मंत्र्यांना अन् शासकीय अधिकाऱ्यांनाही कळत नाही.

अनेकदा मी काय बोललो हे समजून घेण्यासाठी मंत्री अधिकाऱ्यांना आणि अधिकारी आमच्या माणसांना विचारतात, असा अनुभवही जरांगे पाटील यांनी या संवाद कार्यक्रमात सांगितला.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT