OBC Reservation News : ओबीसी आरक्षणाचा मार्ग सुकर; महाराष्ट्रातील 'या' समाजाने मानले सरकारचे आभार !

Maratha VS OBC : मराठा आणि ओबीसी यांच्यामधील वाद वाढतो की काय, अशी परिस्थिती आहे.
Sumit Wankhade's Post
Sumit Wankhade's PostSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra OBC VS Maratha Political News : ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मुद्द्यावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. ओबीसी समाजाने जरांगे पाटील यांच्या या मागणीला विरोध व्यक्त केला आहे. त्यामुळे मराठा आणि ओबीसी यांच्यामधील वाद वाढतो की काय, अशी परिस्थिती आहे. (The situation is whether the conflict between the Marathas and the OBCs increases)

असे असताना महाराष्ट्रातील एका समाजाने ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याचा मार्ग सुकर झाल्याने भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचे आभारही मानून टाकले आहे. आभाराच्या या पोस्टखाली अनेकांनी समाजाचे अभिनंदनही केले आहे. तशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

महाराष्ट्रातील विदर्भाच्या कारंजा घाडगे, गोंदिया, भंडारा जिल्ह्यांत तसेच मध्य प्रदेशच्या काही भागांत भोयर पवार या समाजाचे प्राबल्य आहे. या समाजाला राष्ट्रीय मागासवर्ग यादीत समावेश करण्याबाबत महत्त्वाची सुनावणी १७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने आयोजित केली आहे. भोयर पवार समाजासह अन्य काही समाजांना केंद्र सरकारच्या नोकऱ्यांत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याचा निर्णय या सुनावणीच्या माध्यमातून कालांतराने होणार आहे.

मात्र, ही सुनावणी होण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सुमीत वानखेडे यांनी सोशल मीडियावर आभाराची पोस्ट टाकली आहे. आरक्षणाचा मार्ग सुकर झाल्याने त्यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर तसेच फडणवीस यांचे आभारही मानले आहेत. ही पोस्ट सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात संघर्ष करीत असलेल्या विविध समाजांच्या सोशल मीडिया समूहांमध्ये ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीच्या माध्यमातून असे म्हटले आहे की, आयोगाकडे लोध, लोधा, लोधी, बडगुजर, वीरशैव लिंगायत, सलामानी, सैन, किराड, भोयर पवार, सूर्यवंशी गुर्जर, बेलदार, डांगरी, कलवार या जातींना राष्ट्रीय मागासवर्ग यादीत समाविष्ट करण्यासाठी आयोगाला अनेक निवेदने प्राप्त झाली आहेत.

या संदर्भात मुंबई येथे उद्या, १७ ऑक्टोबर २०२३ रोजी मलबार हिल येथे जनसुनावणी ठेवण्यात आली आहे. मात्र, त्यापूर्वीच आभाराच्या व त्यानंतर काहींच्या अभिनंदनाच्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. या पोस्टवर विविध समाजांच्या व्हॉट्सअॅप ग्रुप्समध्ये चर्चांना सुरुवात झाली आहे.

Sumit Wankhade's Post
Maratha Vs OBC Community : जरांगे पाटलांच्या इशाऱ्यानंतर ओबीसी समाज ‘अलर्ट’ मोडवर!

आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या महाराष्ट्रामध्ये रणकंदन माजले आहे. मराठा, ओबीसी, धनगर आणि आदिवासी समाजांमध्ये या मुद्द्यावरून मतमतांतरं आहेत. अशात केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मागासवर्ग यादीत काही जाती समूहांचा समावेश करण्याबाबत सुनावणी होत आहे. या जाती समूहांनी जनसुनावणीत सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारावर पुढील निर्णय होणार आहे.

Edited By : Atul Mehere

Sumit Wankhade's Post
OBC Kranti Morcha News : अजित पवारांना ओबीसी वसतिगृहाचा तिटकारा का, ‘या’ ओबीसी संघटनेचा थेट सवाल !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com