Shivsena : `शासन आपल्या दारी`, हा कार्यक्रम म्हणजे सरकारी पैशाचा अपव्य आणि प्रशासकीय यंत्रणेवर अंकुश नसल्याचे दर्शवणारा शो आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मोठे प्रकल्प कार्यन्वित केले पाहिजे, पण ते गावागावत फिरून योजना सांगत आहेत. (Ambadas Danve On CM-DCM News) पण प्रत्यक्षात सरकार सांगत असलेल्या योजना वर्षभरापासून रखडलेल्या आहेत, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला.
सरकारच्या `शासन आपल्या दारी`, या कार्यक्रमाला ठाकरे गटाकडून `होऊ द्या चर्चा`, या मोहिमेतून प्रत्युत्तर दिले जात आहे. (Shivsena) अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या हा उपक्रम सुरू आहे. (Eknath Shinde) राज्यातील घडामोडी, मंत्रीमंडळात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना महत्वाची खाती आणि रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार या पार्श्वभूमीवर शिंदे व भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांमध्ये कमालीची नाराजी आहे.
त्यामुळे शासन आपल्या दारी नाही, तर आता घरी जाणार, असा टोला देखील दानवे यांनी लगावला. (Devendra Fadanvis) केंद्र आणि राज्य सरकार गरीबांसाठी योजना राबवत असल्याच्या फक्त मोठ्या जाहीराती करत आहे. प्रत्यक्षात गरीबांना या योजनांचा लाभच मिळत नाही, ही वस्तुस्थिती `होऊ द्या चर्चा`, च्या माध्यमातून समोर येत आहे.
अनेक गावातील योजना बंद पडल्या आहेत किंवा रखडल्या तरी आहेत. मग शासन आपली पाठ कशी थोपटवून घेवू शकते? केवळ शोबाजी करण्यासाठी सरकार गावोगावी जात आहे. सरकारच्या योजना सांगण्यासाठी तुम्हाला गावागावांमध्ये फिरावे लागत असले तर तुमचा प्रशासनावर, अधिकाऱ्यांवर अंकुश नाही हेच स्पष्ट होते, अशी टीका देखील दानवे यांनी यावेळी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.