Mla Haribhau Bagde News : बागडे नाना पुन्हा संतापले, गुत्तेदाराला दिला दम..

Marathwada : जिल्ह्यात तुम्हाला कुठेही काम करू देणार नाही, असा इशाराही दिला.
Mla Haribhau Bagde News
Mla Haribhau Bagde NewsSarkarnama
Published on
Updated on

BJP : माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे भाजपमधील ज्येष्ठ नेते आहेत. फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नानांचा रुद्रावतार पुन्हा एकदा दिसून आला. (Mla Haribhau Bagde News) गेल्या महिन्यात मतदारसंघातील सिंचन विहिरींच्या फायली रखडल्यामुळे संतापलेल्या बागडेंनी चक्क आठ तास पंचायत समितीच्या कार्यालयात ठिय्या दिला होता.

Mla Haribhau Bagde News
Mla Bangar- MP Patil News : राज्यात नाही तर केंद्रात द्या, मंत्रीपदासाठी दंड थोपटले ...

फायलींवर सह्या का केल्या नाहीत? असा जाब त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना विचारला होता. त्यानंतर रखडलेल्या सगळ्या फायलींवर सह्या झाल्या होत्या. (Haribhau Bagde) बागडेंच्या या आक्रमक पावित्र्यांची तेव्हा राज्यभरात चर्चा झाली. (BJP) महिनाभरात दुसऱ्यांदा बागडेंचा रुद्रावतार आज पुन्हा पहायला मिळाला.

जटवाडा शिवारात 33 केव्ही सबस्टेशन अंतर्गत गणेश नगर येथील १५ शेतकऱ्यांना स्वतंत्र रोहित मंजूर झाले होते. (Marathwada) सदरील कामही सुरू होवून विद्युत खांबही रोवण्यात आले. परंतु गेल्या दीड वर्षापासून सदरील काम बंद असल्यामुळे या विद्युत खांबावर अद्याप तारा ओढण्यात आलेल्या नाहीत. परिणामी येथील शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

हा प्रकार आमदार हरिभाऊ बागडे यांना समजला तेव्हा त्यांनी थेट जटवाडा शिवार गाठत प्रत्यक्ष पाहणी केली. तिथूनच त्यांनी काम करणाऱ्या कंत्राटदाराला फोन लावला. जमत नसेल तर तुम्ही कामे घेता कशाला.? उद्या काम सुरू केले नाही तर तुम्हाला दमडीही मिळू देणार नाही, अशा शब्दात खडसावले. एवढेच नाही, तर संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुम्हाला कुठेही काम करू देणार नाही, असा इशाराही दिला. नानांचा चढलेला पारा पाहून कंत्राटदाराचे धाबे चांगलेच दणाणले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com