Maharashtra breaking news : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कटात आणखी एका संशयित कांचन साळवे याला जालना पोलिसांनी मध्यरात्री बीडमधून ताब्यात घेतलं. कांचन साळवे हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा समर्थक आहे.
बीड शहरातील काही कामे तो पाहायचा, अशी प्राथमिक माहिती समोर आली असून याच कांचन साळवे याचे पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी नाव घेतले होते. याशिवाय कांचन साळे याचे धनंजय मुंडे यांच्यासमवेतचे फोटो देखील व्हायरल झाले आहेत.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या हत्या करण्याचा कटासाठी सुमारे अडीच कोटींची सुपारी देवून रचल्याची गेल्या आठवड्यात देण्यात आली. जरांगे पाटील यांनीही स्वतः पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेतली होती. पोलिसांनी तक्रारीनुसार तातडीने पावले उचलत गेवराईतून दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. या प्रकरणानंतर जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या हत्याच्या कटाची माहिती समोर येताच, पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला. जरांगे पाटील यांनी स्वतः तक्रार दिली. तसंच याप्रकरणी प्रेस घेऊन संशियतांची नावे जाहीर केली. यानुसार पोलिसांनी सुरूवातीला गेवराई तालुक्यातील अमोल खुणे व दादा गरूड ऊर्फ विवेक, या दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले. यातील एक संशयित हा मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी आहे.
जालना पोलिसांनी या गुन्ह्यात कांचन साळवे याला ताब्यात घेतलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद देखील त्याचे दोनदा नाव घेतले होते. तेव्हापासून कांचन साळवे चर्चेत होता. यानंतर कांचन साळवे यांचे या कटाशी संबंध नसल्याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याने या प्रकरणात आणखी काय समोर येते, याकडे लक्ष असणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते की, "बीडमधील एक कार्यकर्ता एका आरोपीकडे गेला आणि कटाला खरी सुरवात झाली. या कटाच्या मुळापर्यंत मी पोहोचणार आहे. जेवणात विष टाकून मारण्याचा आधी कट रचला गेला होता. बीडमधील कांचन नावाचा माणूस आहे तो, धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता आहे किंवा पीए आहे."
"धनंजय मुंडे यांनी माझ्याविरोधात षडयंत्र रचण्याचे काम केलं आहे. बीडच्या कार्यकर्त्याने आरोपींना परळीला नेलं अन् तिथं बैठक घेतली. ती बैठक धनंजय मुंडेंनी सोडली अन् धनंजय मुंडेंसोबत चर्चा करून बाहेर आला. कांचन अन् धनंजय मुंडे यांच्यामध्ये 20 मिनिटं चर्चा झाली. धनंजय मुंडेंनी हे करायला सांगितले हे दोन आरोपींना माहित होते. याचा सखोल तपास होणं गरजेचं आहे. मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील झाली. भाऊबीजेच्या दिवशी हे आरोपींचा पुन्हा त्यांना हा कट शिजवला. यामध्ये खूप जण आहेत. हे करणाऱ्यापेक्षा यामध्ये मूळ धनंजय मुंडे आहे," असे जरांगे पाटील यांनी म्हटले होते.
मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळले अन् जोरदार प्रत्युत्तर दिले. तसंच या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केलेली. यासोबतच आरोपींसह आपली आणि मनोज जरांगेंची नार्को टेस्ट करण्याची मागणीही धनंजय मुंडेंनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.