Manoj Jarange Slams Eknath Shinde Sarkarnama
मराठवाडा

Jai Gujarat slogan criticism : एकनाथ शिंदेंचा 'जय गुजरात' नारा; जरांगे पाटील म्हणाले, 'मी ऐकलं नाही, नाहीतर खऊट...'

Manoj Jarange Slams Eknath Shinde Over 'Jai Gujarat' Slogan in Pune : पुणे इथं शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'जय गुजरात' घोषणेवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

Pradeep Pendhare

Manoj Jarange Eknath Shinde controversy : पुण्यातील गुजराती समाजाच्या कार्यक्रमात शिवसेना नेता तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात, असा नारा दिला. ठाकरे बंधूंचा उद्या मुंबईत हिंदी सक्तीचा अध्यादेश रद्द झाल्याने, विजय मेळावा होत आहे.

तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांनी दिलेला हा नारा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा स्क्रिप्टेट असल्याचा वास येऊ लागला आहे. यावर मराठा आंदोलनक मनोज जरांगे पाटील यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. 'मी एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया ऐकलेली नाही. परंतु ती ऐकली असती, तर नक्कीच खऊट बोललो असतो', असा टोला मनोज जरांगे यांनी लगावला आहे.

मनोज जरांगे धाराशिव दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील कार्यक्रमात भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासमोर 'जय हिंद, जय महाराष्ट्र अन् जय गुजरात', अशी घोषणा दिली. एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात घोषणेवर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा 'जय गुजरात' म्हणणे हे महाराष्ट्राला रुचण्यासारखं आहे का?, या प्रश्नावर मनोज जरांगे म्हणाले, "असं बोलणं अजिबात योग्य नाही. परंतु मी ते काही ऐकलं नाही. त्यामुळे मी त्यावर प्रतिक्रिया देत नाही. नाहीतर आपली प्रतिक्रिया खऊट असली असती. चांगली नसती".

एकनाथ शिंदे यांची ही घोषणा म्हणजे, चांगली गोष्ट नाही. आपलं राज्य मराठी आहे. जर तुम्हाला हिंदीची सक्ती महाराष्ट्रासह देशात करायची असेल, तर मराठी देखील सक्ती देशात करा. होणार का ती? नसेल होणार, तर मग इथं हिंदी कशाला? सारखा न्याय पाहिजे, असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.

एकनाथ शिंदेंना विरोधकांना घेरलं

एकनाथ शिंदे यांनी 'जय गुजरात' नाऱ्यावरून विरोधकांनी जोरदार टीकास्त्र सोडण्यास सुरूवात केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत, माजी महापौर किशोर पेडणेकर, 'मनसे'चे अविनाश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे.

शिंदेच्या बचावासाठी फडणवीस मैदान

'जय गुजरात' नाऱ्यावरून एकनाथ शिंदे विरोधकांच्या रडारवर आल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या बचावासाठी मैदानात आले. शरद पवार यांनी 'जय कर्नाटक' म्हटल्याची त्यांनी आठवण करून दिली. तसेच, उद्धव ठाकरे यांनी 'जय गुजरात' म्हटल्याचा देखील व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT