Sanjay Raut : शिंदेंनी ‘जय गुजरात’ची गर्जना करताच राऊतांनी फडणवीसांकडे केली मोठी मागणी; म्हणाले, ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा...

Eknath Shinde’s ‘Jai Gujarat’ Slogan Sparks Political Reaction : संजय राऊत यांनी शिंदेंचा व्हिडीओ शेअर करत सोशल मीडियात एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी फडणवीसांना टॅग केले आहे.
Sanjay Raut,Eknath Shinde, Devendra Fadnavis
Sanjay Raut,Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut Questions Devendra Fadnavis Over Shinde’s Remark : पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या ‘जय गुजरात’च्या नाऱ्यावरून आता राजकारण तापले आहे. विरोधी पक्षातील नेत्यांकडून शिंदेंवर टीका केली जात असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.

संजय राऊत यांनी शिंदेंचा व्हिडीओ शेअर करत सोशल मीडियात एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी फडणवीसांना टॅग केले आहे. राऊतांनी म्हटले आहे की, अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले. पुण्यात या महाशयांनी अमित शहा समोर “जय गुजरात“ ची गर्जना केली. काय करायचे?, असा सवाल राऊतांनी केला आहे.

ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा, हजार माराव्या आणि एक मोजाव्या... असेही राऊत म्हणाले आहेत. हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो?, असा सवाल राऊतांनी फडणवीस यांना केला आहे. अप्रत्यक्षपणे राऊतांनी शिंदेंना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Sanjay Raut,Eknath Shinde, Devendra Fadnavis
PM Modi in Ghana : मोदींनी भारतातील राजकीय पक्षांची माहिती देताच घानाची संसद हबकली; भाषण थांबवले अन् पाहतच राहिले...

काय म्हणालेत एकनाथ शिंदे?

मला 2022 मध्ये अनुभव आला आहे. राज्यात दुकाने, घरं, मंदीर, सण बंद होते. सगळे स्पीडब्रेकर होते. त्यावेळी सर्वसामान्यांचे सरकार आणण्याची आवश्यकता होते. मी गर्वाने सांगतो की, त्यावेळी मोदींचे मार्गदर्शन तर होतेच पण अमितभाई माझ्यामागे खंबीरपणे उभे होते. ते काम सोपे नव्हते. पण जेव्हा राज्याच्या विकासासाठी अशी पावले उचलावी लागता. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो, असे शिंदे म्हणाले.

अमितभाई तर महाराष्ट्राचे जावई. देशाचे ते गृहमंत्री आहेत. पण त्यांच्या गृहमंत्री कोल्हापूरच्या आहेत. त्यांच्या घरात मराठी आणि गुजराती या दोन्ही भाषा आनंदाने नांदतात. म्हणून महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांनी विकास, उद्योग आणि संस्कृतीच्या क्षेत्रात नेहमीच देशाला दिशा दाखवल्याचे शिंदेंनी सांगितले.

Sanjay Raut,Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde : शहांसमोर एकनाथ शिंदेंकडून ‘जय महाराष्ट्र, जय गुजरात’चा नारा; 2022 मधील बंडाची आठवण अन् तोंडभरून कौतुकही...

व्यापारी, उद्योजक विकासासाठी आवश्यक आहेत. तुम्हाला व्यवसायात कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास देतो. त्यानंतर त्यांनी शहांचे कौतुक करणारे शायरी सुनावली आणि भाषण संपवले. भाषण संपविताना त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असा नारा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com