Rohit Pawar and Chhagan Bhujbal Sarkarnama
मराठवाडा

Rohit Pawar On Bhujbal:'...पण भुजबळांनी ओबीसी कल्याण खाते सांभाळले नाही'; रोहित पवारांचा टोला

Rohit Pawar On Chhagan Bhujbal: पंकजा मुंडे यांच्यासारख्या ओबीसी नेत्यांची ताकद कमी करून भुजबळांची ताकद भाजप वाढवत आहे," रोहित पवारांचा आरोप

Datta Deshmukh

Beed News: मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या चांगलाच तापलेला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रभर आंदोलनाचे रान उठवले आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे पाटलांनी केलेली आहे, पण या मागणीला मंत्री भुजबळांसह ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. मंत्री भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी भुजबळांना खोचक टोला लगावला आहे.

"मराठा ओबीसी वाद लावण्याचा नेत्यांकडून प्रयत्न होत आहे. मात्र, सामान्य मराठा आणि ओबीसींमध्ये वाद नाहीत. छगन भुजबळ जेष्ठ मंत्री आहेत. त्यांनी अंबडला केलेले भाषण हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहून दिलेली स्क्रीप्ट होती, असा आरोप करत भुजबळांनी मंत्री म्हणून अनेक मोठमोठी खाती सांभाळली. ज्याला सर्वाधिक आर्थिक तरतूद असते, अशी खाती त्यांनी सांभाळली. मात्र, कमी आर्थिक तरतूद असलेले ओबीसी कल्याण खाते सांभाळले नाही," असा टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने रोहित पवार सध्या बीडमध्ये होते. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री भुजबळांवर टीका केली. "भाजमध्ये असताना एकनाथ खडसे, दिवंगत पांडुरंग फुंडकर यांची ताकद कमी केली गेली. आताही पंकजा मुंडे यांच्यासाख्या ओबीसी नेत्यांची ताकद कमी करून छगन भुजबळांची ताकद भाजप वाढवत आहे," असा आरोप करत पंकजा मुंडे यांनीच सभेला जाणाऱ्यांमध्ये भाजपच्या इतर नेत्यांची नावे टाकल्याचे सांगितले. त्यामुळे यावरून हे स्पष्ट होत असल्याचे रोहित पवार म्हणाले.

"सर्व नेत्यांनी एकत्र बसवून आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढावा, पण दिल्लीत या प्रश्नासंदर्भात कोणीही बोलत नाही. मराठा समाजाचा एकही भाजप खासदार आरक्षणाबद्दल बोलला नाही," असेही ते म्हणाले.

"आरक्षणाच्या प्रश्नावर दिल्लीत सुप्रिया सुळे बोलतात. संभाजीराजेंना बोलायचे होते, पण त्यांना जाणीवपूर्वक बोलू दिले जात नव्हते. मात्र, संजय राऊत यांच्या हस्तक्षेपानंतर त्यांना पाच मिनिटे बोलू दिले, स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणाविरुद्ध भाजपचेच लोक कोर्टात गेले," असा आरोपही रोहित पवारांनी केला.

याचवेळी बीडमध्ये घडलेल्या घटनेमागेही सरकारमधील व्यक्तीचे हात असल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला. आपण नुकसान झालेल्यांची चर्चा केली. कोणालाही भरपाईची अपेक्षा नाही, पण यामागे कोण ? याचा शोध लागावा, अशी मागणी सर्वजण करत आहेत. तसेच बीडच्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही या वेळी त्यांनी केली.

Edited by Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT