ratnakar gutte sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation : मराठा बांधव आक्रमक; आमदार रत्नाकर गुट्टेंची अडवली गाडी

Maratha Reservation car of Ratnakar Gutte intercepted : मराठा समाज बांधवांनी रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांची गाडी अडवून त्यांना गावात येण्यास मज्जाव केला.

Sachin Waghmare

Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठा आरक्षणासाठी मराठा बांधवांनी आक्रमकपणे आंदोलन केले आहे. अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांनी दोन वेळा उपोषण करीत राज्य सरकारला जेरीस आणले. त्यासोबतच आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना गावबंदी केलेली आहे. परभणी जिल्हयातील मराठा समाज बांधवांनी रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांची गाडी अडवून त्यांना गावात येण्यास मज्जाव केला. त्याचवेळी एक मराठा लाख मराठा, अशी घोषणाबाजी केली, त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.

गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. त्यासाठी सर्वत्र आंदोलन केले जात आहे. आमदार रत्नाकर गुट्टे हे परभणी तालुक्यातील पडेगावात एका कीर्तनाच्या कार्यक्रमाला जात होते. त्यावेळी मराठा बांधवानी त्यांची गाडी अडवली. मराठा बांधव आक्रमक होताच आमदार गुट्टे यांनी देखील त्यांच्यसॊबतच एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या. यामुळे संतप्त झालेले मराठा बांधव काहीसे शांत झाले.

दोन दिवसांपूर्वी देखील मराठा बांधवांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या होणाऱ्या कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता. तीन दिवसात दोनदा आमदार गुट्टे याना मराठा बांधवांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आता त्यांना कार्यक्रमांना जाण्यापूर्वी दक्षता घ्यावी लागणार आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी लक्षवेधी लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार घेत होते. रविवारी त्यांना रूग्णालयातून डिस्चार्च मिळला. त्याआधी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी यंदा दिवाळी साजरी करणार नसल्याचे सांगितले. मराठा आरक्षणासाठी अनेकांनी आत्महत्या केल्यात त्यामुळे दिवाळीचा सण साजरा करणार नसल्याचे जरांगे पाटील म्हणालेत.

SCROLL FOR NEXT