Maratha Reservation Issue : मनोज जरांगे-पाटील यांनी कोणाचा करेक्ट कार्यक्रम केला?

Maratha Reservation Protest News : मराठा आंदोलनातून येवला मतदारसंघातील नकारात्मक वातावरण अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.
Manoj Jarange Patil & Chhagan Bhujbal
Manoj Jarange Patil & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange-Patil C/S Bhujbal : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे-पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यात सुरू केलेले उपोषण अखेर गुरुवारी मागे घेतले. राज्य सरकारने त्यांची मागणी मान्य केल्यासारखेच आहे.

यामध्ये जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाने येवला मतदारसंघात छगन भुजबळ यांचा करेक्ट कार्यक्रम होऊ शकेल का? याची चर्चा सुरू झाली आहे. (Maratha reservation deemands ultimately Down Chhagan Bhujbal politics)

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठीचे उपोषण मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे राज्य सरकार (Maharashtra Government) हा प्रश्न येत्या दोन महिन्यांत सोडवेल अशी अपेक्षा आहे. या सर्व राजकारणात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) का टार्गेट झाले? अशी चर्चा आहे.

Manoj Jarange Patil & Chhagan Bhujbal
Suhas Kande News : राष्ट्रवादी, शिवसेनेकडून आमदार कांदेंची कोंडी?

महाराष्ट्रात गेले दोन महिने मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण चर्चेत होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी केलेल्या आंदोलनात पोलिसांनी अतिरेकी हस्तक्षेप करीत लाठीमार केला. त्याच्या क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या.

अंतरवाली सराटी (जालना) गावापुरते मर्यादित असलेले हे आंदोलन त्यातून सबंध राज्यभर पसरले. त्यामुळे अनेक नेत्यांना त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा मोह आवरता आला नाही.

याबाबत सातत्याने ओबीसी समाजाचे नेते अशी प्रतिमा निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिका, जरांगे पाटील यांच्यावर केलेले थेट आरोप यातून ते टार्गेट झाले. जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन तसेच अंतरवाली येथे घेतलेल्या प्रचंड सभेनंतर छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

लासलगाव आणि येवला या दोन्ही बाजार समित्यांसह अनेक ग्रामपंचायत कार्यालयांतून छगन भुजबळ यांच्या प्रतिमा काढून फेकून देण्यात आल्या. कार्यकर्त्यांचा त्यात एवढा दबाव होता, की हे काम भुजबळ यांच्या मराठा समाजातील समर्थकांना करावे लागले. एक नकारात्मक सूर उमटला. तो भुजबळ यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीतदेखील गतिरोधकाचे काम करीत राहणार आहे.

अनेक मोठे नेते सातत्याने टार्गेट होत होते. त्यांनी संयम दाखवीत मौन बाळगणे पसंत केले. मात्र, याच कालावधीत मंत्रिमंडळात असूनदेखील भुजबळ यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद मराठा आरक्षणाच्या आंदोलनाविरोधात मेळावे घेत होती.

Manoj Jarange Patil & Chhagan Bhujbal
Ravindra Waikar : ठाकरे गटाच्या आमदाराला झटका; ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल, अटकेची टांगती तलवार!

यामध्ये मंत्री असल्याने, वरिष्ठांच्या दबावामुळे भुजबळ काहीच करू शकत नव्हते. त्यांची संघटना एका मर्यादेत आंदोलन करीत होती. हे सगळे विचारात घेतले, तर भुजबळांना गप्प राहणे शक्य नव्हते, ते बोलले त्यातून होणारी राजकीय हानी त्यांच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठी होती. हे सर्व आता रस्त्यावरच्या चर्चेचा विषय बनल्याने जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनातून अप्रत्यक्षपणे कोणाचा करेक्ट कार्यक्रम केला, तर त्यात भुजबळांचे नाव पहिल्या क्रमांकावर येते.

Manoj Jarange Patil & Chhagan Bhujbal
Sangli News: हायटेक प्रचाराबरोबरच ब्लॅक मॅजिकचाही वापर; काळ्या बाहुल्यांची पूजा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com