Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation : ‘मी कोणत्याही परिस्थितीत मॅनेज होत नाही, हीच सरकारची मोठी अडचण’

Manoj Jarange Patil Beed Sabha : देव जरी आडवा आला तरी आता मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळणार आणि ते आपण घेणार.

Vijaykumar Dudhale

Beed News : मराठ्यांच्या अनेक पिढ्या आरक्षणाचे स्वप्न पाहण्यातच वाया गेल्या आहेत. आरक्षण नसल्यामुळे मराठ्यांचा आतापर्यंत घात झाला आहे. पण, आता सावध व्हावा, ही शेवटची संधी आहे. त्याचं सोनं करा. देव जरी आडवा आली तरी आता मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळणार आणि ते आपण घेणार, असे चॅलेंज मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा दिले. तसेच, मी कोणत्याही परिस्थितीत मॅनेज होत नाही, हीच सरकारची मोठी अडचण आहे, असेही त्यांनी सांगितले. (Maratha Reservation : I am not managing, this is biggest problem of government : Jarange)

मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरची डेडलाईन दिली होती. पण, ता. २३ डिसेंबरपर्यंत सरकारने निर्णय घेतला नव्हता, त्यामुळे बीडमध्ये आज जरांगे पाटील यांनी निर्णायक इशारा सभा घेतली. त्यात २० जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसण्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी जाहीर केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, तुमच्या एकजुटीची ताकद मी वाया जाऊ देणार नाही. मी कोणत्याही परिस्थितीत मॅनेज होत नाही. हीच सरकारची मोठी अडचण आहे. पण, मी काय चुकीचे करतो आहे. मराठ्यांच्या चेहऱ्यावरील आरक्षणाचा आनंद पहायचा आहे. आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजाच्या अनेक पिढ्या वाया गेल्या आहेत.

मला हे लोक शत्रू समजू लागले आहेत. मी काय चूक केली. आमच्या लोकांचे मुडदे पडू लागले आहेत. सरकार कुठंपर्यंत झोपणार आहे. पण, आम्ही एकाचेही बलिदान वाया जाऊ देणार नाही. सरकार मराठ्यांचा अपमान आणि फसवणूक करत आहे. मराठ्यांच्या जिवावर सत्तेचे गाजर मिळवायचे आणि सत्ताचा लाभ छगन भुजबळ यांच्यासारख्यांना द्यायचा. हे आता सहन केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला

मराठ्यांकडे लक्ष द्यायचे नाही. सरकार गांभीर्याने घेत नाही. पण, सरकारला वठणीवर आणण्यासाठी मराठ्यांची ताकद दाखवून द्यायची आहे. त्यांना मला शत्रू समजायचे असेल तर समजू द्या. पण, तुमची ताकद पाठीशी असल्याने मी काय त्यांची भीती घेणार आहे का. जे आपल्या बाजूचे, तेच आपले नेते. मतं घेण्यापुरता दारात आला तर त्याला चप्पलांनी प्रसाद द्या. आमच्या जीवावर मोठे होता आणि आमचेच मुडदे पाहून हसत बसतात. तुम्हाला लाज वाटत नाही का, असा सवालही मनोज जरांगे यांनी सरकारला विचारला.

राज्याच्या प्रमुखांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न एक दणक्यात मार्गी लावला पाहिजे. मराठ्यांकडे कुणबीच्या नोंदी सापडूनही आरक्षण दिले जात नाही. ह्या राजकारण्यांना मराठे संपवायचे आहेत. मराठा समाजाला पुन्हा डवचू नका. अंतरवाली सराटीत पहिला प्रयोग केला, पुन्हा तो प्रयोग करू नका, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT