Beed News : आम्हालाही कुठे जायची हौस नाही पण, आम्ही किती सहन करायचे? मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी पहिल्यांदा तीन महिने, त्यानंतर 40 दिवस आणि आता दोन महिने असा वेळ सरकारने घेतला. आमच्याकडून किती वेळ घेणार. आम्हालाही मर्यादा आहेत. सरकारने शब्द पाळला नाही, त्यामुळे येत्या 20 जानेवारीपासून मी मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसणार आहे. मला भेटायला तुम्ही मुंबईला या, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या सभेत जाहीर केले.
मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे-पाटील यांची आज बीडमध्ये जंगी सभा झाली. त्या सभेत त्यांनी आरक्षणासंदर्भातील पुढील रणनीती जाहीर केली. ते म्हणाले की, सरकारने 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर आम्ही मुंबईत धडकणार, असे जाहीर केले होते. पण, सरकारने 18 जानेवारीपर्यंत मुंबईत जमावबंदी केली. त्यामुळे आपणही 20 जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार. तुम्ही सगळे मला भेटायला मुंबईत या, बघू सरकार कसे अडवते ते!
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सरकारने पूर्वी अंतरवाली सराटीमध्ये आपल्याला गुंतवायचा प्रयत्न केला. त्यानंतर राज्यातील मराठा समाजाच्या लोकांना नोटिसा देण्यात आल्या. आमच्या लेकरांचे मुडदे आम्ही पाहू शकत नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आता सुटीच नाही. आता आंदोलन शांततेच करायचं. पण, मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचे नाही. शब्द पाळायचा पण मागे घ्यायचा नाही, असेही जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले
जरांगे-पाटील म्हणाले की, तुमच्या एकजुटीचा ताकद आम्ही वाया जाऊ देणार नाही. मी सरकारला कोणत्याही परिस्थिती मॅनेज होत नाही. हीच त्यांची अडचण नाही. मी काय चुकीचे करतो आहे? मराठ्यांच्या चेहऱ्यावरील आरक्षणाचा आनंद आम्हाला पाहायचा आहे. मराठा समाजाच्या अनेक पिढ्या वाया गेल्या आहेत. मराठ्यांच्या अनेक पिढ्या आरक्षणाचे स्वप्न पाहण्यातच वाया गेल्या आहेत. आरक्षण नसल्यामुळे घात झाला आहे. पण आता सावध व्हावा. ही शेवटची संधी आहे. त्याचं सोनं करा. देव जरी आडवा आली तरी मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळणार आणि ते आपण घेणार.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.