Vinod Patil Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation News: मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी कायदेशीर लढाई, याचिकाकर्ते विनोद पाटील उतरणार मैदानात

Vinod Patil Political News: मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी आपण कायदेशीर लढा देऊ, असे सांगत पुन्हा मैदानात उडी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला विनोद पाटील यांच्या प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवात सहभागी होत आरती केली.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी आपण कायदेशीर लढा देऊ, असे सांगत पुन्हा मैदानात उडी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला विनोद पाटील यांच्या प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवात सहभागी होत आरती केली.

यानंतर दुसऱ्याच दिवशी पहाटे बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सरकारला तीन महिन्याची मुदत घेत स्थगित केले होते. या पार्श्वभूमीवर विनोद पाटील यांनी मराठा आरक्षणाविषयीची आपली भूमिका, सरकारकडून अपेक्षा आणि जरांगे पाटील यांच्या लढ्यावर पत्रकारांशी संवाद साधला.

मराठा समाजासाठी केंद्रात ईडब्लूएस, राज्यात ईसीबीसीचे आरक्षण लागू आहे. या शिवाय कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे त्यांना आरक्षण मिळते. परंतु इतरांचे काय? हा प्रश्न कायम आहे. कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे सरकट मराठवाड्यात आरक्षण मिळू शकत नाही हे आता स्पष्ट झाले आहे. सरकार न्यायालयीन लढाईला बगल देत आहे. खरतर सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असेही विनोद पाटील म्हणाले.

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण अनेक वर्षापासून न्यायालयीन लढा देत आहोत. आत पुन्हा एकदा कायदेशीर लढाई लढण्यासाठी पूर्ण ताकदीने आपण सज्ज झालो आहोत. मुंबई उच्च न्यायालयात आज होणाऱ्या महत्त्वाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भूमिका मांडली.

मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या पद्धतीने प्रामाणिक प्रयत्न केले आणि कुणबी नोंदी शोधण्याचा मुद्दा लावून धरला. परंतु ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांचे काम झाले, मग ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या उर्वरित मराठा समाजाचे काय? हा मोठा प्रश्न कायम आहे. हैदराबाद गॅझेट पूर्णपणे लागू झालेले नाही, ती केवळ एक पुस्तिका होती हे मी आधीच स्पष्ट केले होते.

सरकारने पूर्ण गॅझेट लागू केल्याशिवाय सर्वांना प्रमाणपत्रे मिळू शकत नाहीत. त्यामुळे ज्यांच्या नोंदी नाहीत, त्यांना कायदेशीर मार्गाने न्याय मिळवून देणे हाच आमचा मुख्य उद्देश असल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले. एकाच समाजात केंद्रात EWS आणि राज्यात SEBC अशी स्थिती असल्याने विद्यार्थी प्रचंड गोंधळात आहेत.

पोलिस भरतीमध्ये मराठा तरुणांचा टक्का फार कमी असल्याचे सांगत याकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सध्या मोठ्या प्रमाणावर प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने सरकारने तातडीने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही पाटील यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT