Maratha vs OBC reservation Sarkarnama
मराठवाडा

Maratha vs OBC reservation : मनोज जरांगे-लक्ष्मण हाकेंचा बैठकींचा धडाका; कुणाच्या बैठकीला किती गर्दी? नियोजन जुळलं की, फिस्कटलं?

Maratha Reservation Manoj Jarange Meeting at Jalna, Laxman Hake OBC Meeting in Beed : मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघत असलेल्या मनोज जरांगे पाटीलांनी अंतरवली सराटी इथं, तर लक्ष्मण हाके यांनी बीडमध्ये ओबीसींची बैठक घेतली आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra reservation politics : मराठा आरक्षणासाठी अंतिम लढाई असल्याचे म्हणत, मनोज जरांगे पाटलांनी मुंबईकडे जाण्याचा निर्धार पक्का केला आहे. यासाठी जालना इथल्या अंतरवली सराटीत बैठकांचा सपाटा सुरू आहे.

तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी बीड इथं बैठक घेतली. या दोघांमधील वादानंतर त्यांची पहिलीच बैठक बीडमध्ये होत होती. या बैठकांकडे राज्याचे लक्ष लागलं आहे. कोणत्या बैठकीला किती गर्दी, नियोजन जुळतं की, फिस्कटतंय, याची देखील चर्चा होती. लक्ष्मण हाकेंच्या तथाकथित व्हिडिओ मात्र परिणाम जाणवत होता.

मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टला गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मोर्चा घेऊन धडकणार असल्याचं जाहीर केलं आहे. यासाठी ते 27 ऑगस्टला मुंबईकडे निघणार आहे. या मोर्चा यशस्वी व्हावा, यासाठी त्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. आजही जालना इथल्या अंतरवली सराटी इथं बैठक घेत, मुंबईतील मोर्चाचा आढावा घेतला गेला.

मनोज जरांगे पाटील 27 ऑगस्टला सकाळी दहा वाजता मुंबईकडे (Mumbai) निघणार आहे. तत्पूर्वी त्यांनी बैठकांमधून मराठा समाजाला एकत्रित राहून आरक्षणासाठी आरपारची लढाई लढण्याचं सांगत आहे. जालना इथं आज बैठक झाल्यानंतर उद्या (ता. 24) बीड इथल्या मांजरसुंबा इथं बैठक होणार आहे. या बैठकीच्या नियोजनाचा देखील आढावा घेण्यात आला आहे.

मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी रेकाॅर्ड ब्रेक गर्दीचे मोर्चे काढले. आता देखील मुंबईला जाण्यापूर्वी मनोज जरांगे पाटलांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्यामुळे बैठकांना मिळालेला प्रतिसाद पाहून मुंबईतील मोर्चाला देखील गर्दी होणार असे दिसते आहे. यामुळे राज्य सरकार देखील अ‍ॅक्शन मोडवर आलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जरांगे पाटील यांच्या मोर्चाला समोरे जाण्याची तयारी केली आहे. यामुळे जरांगे पाटलांच्या मोर्चाच्या अनुषंगाने महायुतीमधील भाजपच्या मंत्र्यांकडून जरांगे पाटलांच्या मोर्चावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

दरम्यान, ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाके देखील मैदानात आहे. जरांगे पाटलांनी हाके वारंवार आव्हान देत आहे. जोरदार टीका करत आहेत. जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईला जाण्यापूर्वी ओबीसी जोडो अभियानाला त्यांनी महाराष्ट्रात सुरवात केली आहे. यातून त्यांनी देखील बैठकांचा सपाटा लावला आहे.

परंतु नांदेड, परभणी, हिंगोली दौऱ्यावर असताना, लक्ष्मण हाके यांनी ओबीसींच्या नेतृत्वावर भाष्य करतानाचा जातीय तेढ निर्माण होईल, असा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडिओवरून त्यांना माफीनामा देखील सादर केला. पण तथाकथित व्हिडिओमुळे लक्ष्मण हाके यांच्या बैठकांवर आता परिणाम जाणवू लागला आहे.

लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपस्थितीत आज बीडमध्ये झालेल्या बैठकीमध्ये खुर्च्या रिकाम्या असल्याचे समोर आलं. यामुळे ओबीसी बांधवांनी पाठ फिरवल्याची चर्चा होती. गर्दी होईना दिसू लागल्यावर बैठक सुरू करण्यात आली. स्टेज सोडून शेवटी समोरासमोर येत ही बैठक झाली. विशेष म्हणजे, लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या वादानंतर या दोघांची पहिलीच एकत्र बैठक होत होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT