Khalid Ka Shivaji film controversy : ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाबाबत न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; ‘सेन्सॉर’ला दिला आदेश

Bombay High Court Refuses to Intervene in Khalid Ka Shivaji Film Screening Stay : ‘खालिद का शिवाजी’च्या प्रदर्शनाला दिलेल्या स्थगितीच्या निर्णयाला चित्रपटाचे दिग्दर्शक राज प्रीतम मोरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Khalid Ka Shivaji film
Khalid Ka Shivaji filmSarkarnama
Published on
Updated on

Khalid movie ban case Mumbai : वादात सापडलेल्या ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाचा वाद उच्च न्यायालयात पोचला आहे. न्यायालयाने प्रदर्शनाच्या स्थगितीच्या निर्णयात तूर्तास हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

स्थगितीला मुदतवाढ देण्यापूर्वी याचिकाकर्ते आणि चित्रपट निर्मात्यांना सुनावणी देण्याचे आदेश न्यायालयाने सेन्सॉर मंडळाला दिले.

‘खालिद का शिवाजी’च्या प्रदर्शनाला दिलेल्या स्थगितीच्या निर्णयाला चित्रपटाचे दिग्दर्शक राज प्रीतम मोरे यांनी उच्च न्यायालयात (Court) धाव घेतली आहे. चुकीच्या तक्रारींच्या आधारे आपल्याला नोटीस पाठवण्यास आली आणि बाजू न ऐकताच चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिल्याचा दावाही केला आहे.

ही स्थगिती सार्वजनिक भावना आणि अस्पष्ट दाव्यांच्या आधारे दिल्याचेही याचिकेत म्हटले आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले खंडपीठापुढे सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने सरकारच्या (Government) निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देऊन चित्रपटाचे प्रदर्शन पुढील आदेशापर्यंत स्थगित राहील, असेही स्पष्ट केले.

Khalid Ka Shivaji film
Congress MLA arrest : गेमिंग अ‍ॅपद्वारे माया जमवली अन् भोवली; डीके शिवकुमारच्या जवळील काँग्रेस आमदार 'ईडी'कडून गजाआड

चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे चुकीचे ऐतिहासिक संदर्भ दिल्याचा दावा करून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 20 ऑगस्टला चित्रपटाचे प्रदर्शन स्थगित करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यापूर्वी याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले असून स्थगितीचा निर्णय देताना याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, असे 'सीबीएफसी'च्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने सुनावणी तहकूब केली.

Khalid Ka Shivaji film
Chakarimani word controversy : ‘चाकरमानी’ शब्द अपमानकारक, यापुढं ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवार घेणार मोठा निर्णय?

प्रदर्शनाला स्थगिती

या चित्रपटासंदर्भात निर्णय देताना इतिहासाची मोडतोड सहन करणार नाही, असे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. या चित्रपटामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून राज्य सरकारनेच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहून चित्रपटाचे सेन्सॉर प्रमाणपत्र रद्द करण्याचे आणि प्रदर्शनच रोखण्यास सांगितल्याचे शेलार यांनी सांगितले.

वादास कारण काय?

‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाच्या शीर्षकावरूनच वादाला सुरवात झाली. शिवाजी खालिदचा कसा असू शकतो, हा महत्त्वाचा मुद्दा असून त्यानंतर ट्रेलरमध्ये ऐकू येणाऱ्या संवादांमध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35 टक्के मुस्लिम सैनिक होते, त्यांचे 11 अंगरक्षक मुस्लिम होते, अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच रायगडावर शिवाजी महाराजांनी मशीद बांधल्याचाही उल्लेख ट्रेलरमध्ये आहे. या तीन गोष्टींवर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेत चुकीचा इतिहास पसरवत असल्यामुळे चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com