Manoj Jarange Patil News Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation : जरांगे-पाटील यांची प्रकृती स्थिर; सरकारी उपचाराबद्दल आज निर्णय घेणार

Manoj Jarange Patil : पाच दिवसांनंतर 'साम'च्या प्रतिनिधीच्या हस्ते जरांगे-पाटील प्यायले पाणी

Avinash Chandane

Antarwali Sarati Jalna :

मराठा आरक्षणाचे योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती आज स्थिर आहे. काल (14 फेब्रुवारी) रात्री ते प्रथमच पाणी प्यायले. जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. काल उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती खूप ढासळली होती. अखेर संध्याकाळी साडेसातच्या सु्मारास 'साम'चे प्रतिनिधी माधव सावरगावे (SAAM TV) यांच्या हस्ते ते एक ग्लास पाणी प्यायले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, यासाठी मनोज जरांगे-पाटील 10 फेब्रुवारीपासून पुन्हा अंतरवाली सराटी गावात बेमुदत उपोषणाला बसले आहेत. काल त्यांच्या नाकातून रक्तस्राव झाल्याने आणि त्यांनी उपचारास नकार दिल्यामुळे डॉक्टर आणि मराठा समाज चिंतीत झाला होता.

जरांगे-पाटील यांनी काल उपचार घेण्यास नकार दिल्यानंतर त्यांना जबरदस्तीने सलाईन लावण्यात आले होते. तेही त्यांनी नंतर काढून टाकले होते. दरम्यान, जरांगे-पाटील उपचाराचे प्रकरण मुंबई हायकोर्टात गेले आहे. काल महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी जरांगे-पाटलांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत, हायकोर्टात (Mumbai Highcourt) सांगितले. त्यावर जरांगे-पाटील यांना सलाईन लावल्याचे त्यांच्या वकिलांनी कोर्टात स्पष्ट केले. (Manoj Jarange Patil is on indefinite hunger strike)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पार्श्वभूमीवर जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) सरकारकडून उपचार करून घेणार का, असा सवाल मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी विचारला. एवढेच नाही तर या प्रकरणी गुरुवारी (15 फेब्रुवारी) स्पष्ट करावे, असे कोर्टाने जरांगे-पाटील यांच्या वकिलांना सांगितले.

मराठा आरक्षणासाठी जरांगे-पाटील यांनी पुन्हा उपोषणाला बसले आहेत. 27 जानेवारीला सरकारने 'सगेसोयरे' (Sagesoyare) या शब्दाचा समावेश करून सरकारने अधिसूचना काढली होती. आणि त्यावर हरकती मागवल्या होत्या. मात्र, सरकारने या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी जरांगे-पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत.

जरांगे-पाटील वारंवार उपोषण करत असल्यामुळे सरकारवरील दबाव वाढला आहे. दरम्यान, आरक्षणासाठी सरकारने 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावले आहे.

(Edited by Avinash Chandane)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT