Maratha Reservation : ...म्हणून अंतरवालीत रडत आलेले मराठा बांधव अखरे काहीसे समाधानाने परतले!

Manoj Jarange Patil News : याशिवाय अगदी विनवण्या करुनही जरांगे यांनी घोटभर पाणी पिण्यासही नकार दिला.
Antarwali
Antarwali Sarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil Antarwali Update : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रांबाबत 'सगेसोयरे' अधिसुचनेचे कायद्यात रुपांतर करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावून बुधवारी त्यांच्या नाकातून रक्त आले. त्यानंतर विविध भागांमधून समाज बांधवांचा ओढा अंतरवाली सराटीकडे सुरु झाला. अखेर त्यांना सलाईन लावल्यानंतर समाज बांधव काहीशा समाधानाने अंतरावलीतून परतत होते.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळावे, यासाठी विविध आंदोलने, दोन वेळा उपोषणे, विविध ठिकाणी सभा, मुंबईकडे समाज बांधवांसह प्रस्थान केल्यानंतर सरकारने केलेल्या चर्चेनंतर मुंबईच्या वेशीवरुन जरांगे पाटील(Manoj Jarange) समाजासह माघारी परतले. समाजाच्या कुणबी - मराठा या सापडलेल्या नोंदींबाबत 'सगेसोयरे' अधिसुचना सरकारने प्रसिद्ध केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र विशेष अधिवेशन बोलावून या अधिसुचनेचे कायद्यात रुपांतर करावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील 10 फेब्रुवारी पासून पुन्हा अंतरवाली सराटीत (ता. अंबड, जि. जालना) उपोषणाला बसले. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत होती. जालना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व तज्ज्ञ त्यांना तपासण्यासाठी आल्यानंतर उपचाराला जरांगे पाटलांनी नकार दिला.

अगदी विनवण्या करुनही त्यांनी घोटभर पाणी पिण्यासही नकार दिला. दरम्यान, मंगळवारी त्यांच्या नाकातून रक्त आल्याचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला. नाक पुसत असलेल्या पांढऱ्या रुमालावर रक्ताचे डाग पडलेले होते. त्यामुळे अंतरवालीत पुन्हा एकदा गर्दी जमायला सुरुवात झाली. वडीगोद्री फाट्यापासून अंतरवालीकडे जाणारा रस्ता पॅक झाला होता. येणारे समाज बांधवांत आणि विशेषत: महिला रडत येताना आढळत होत्या. मंडपात बसलेल्या महिला हंबरडा फोडत होत्या.

Antarwali
Maratha Reservation : महिलांचा हंबरडा, महाराजांची विनंती अन् हात-पाय घट्ट पकडून लावले सलाईन

घोटभर पाणी तरी प्या, अशा विनवण्या समाज बांधव व विशेषत: महिलांकडून केल्या जात होत्या. बुधवारी त्यांच्या नाकातून रक्त आल्यानंतर अंतरवालीतले वातावरण अधिकच भाऊक झाले. उपस्थित महिलांनी हंबरडा फोडला. श्री क्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांनी सलाईन घेण्याची विनंती मनोज जरांगे पाटील यांना केली. यानंतर उपस्थित काही समाज बांधवांनी तुम्ही तुमचे नाहीत समाजाचे आहात असे म्हणत त्यांचे हात - पाय घट्ट पकडले आणि मग डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावले. त्यामुळे आंदोलनस्थळी सुरु असलेला गोंधळही काही काळ शांत झाला आणि मग आलेले समाज बांधव परतीच्या मार्गाने निघत होते. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर काहीसे समाधानाचे भाव होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com