Chhatrapati Sambhajinagar News, 08 : मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत धडक देण्याची तयारी चालवली आहे. येत्या १२ सप्टेंबर रोजी मुंबईतील आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी अंतरवालीत राज्यभरातील समाज बांधवाना येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
एकीकडे मुंबईतील आंदोलनाची तयारी तर दुसरीकडे सरकारच्या वतीने गावागावात ग्रामपंचायतींवर मराठा-कुणबी नोंदींच्या याद्या लावण्याचा कार्यक्रमही हाती घेण्यात येणार आहे. यासाठी १० ते १७ सप्टेंबर दरम्यान सर्व तालुक्यांमध्ये मंडळनिहाय शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात आढळलेल्या मराठा कुणबी, कुणबी मराठा नोंदींची माहिती त्या त्या जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय मंडळस्तरावर शिबिरांचे आयोजन करून ही माहिती लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनीही माहिती दिली.
दरम्यान प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सुचना फलकावर त्या त्या गावातील याद्या प्रदर्शित कराव्या असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आजच्या बैठकीत दुरदृष्यप्रणालीद्वारे दिले आहेत. मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा अशा जात नोंदींची माहिती जुन्या दस्तऐवजांवरुन सापडल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात त्यांची संख्या ५११३ आहे. या सर्व नोंदी व त्यांचे दस्तऐवज डिजीटल स्वरुपात जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. संकेतस्थळावर मराठा कुणबी दस्त नोंदी असा स्वतंत्र टॅग उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यावर जाऊन प्रत्येक तालुकानिहाय नोंदी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
नोंदींची यादी, नाव व दस्ताचा प्रकार या द्वारे पाहता येणार आहे. प्रत्यक्ष दस्तही डिजीटल स्वरुपात प्रमाणित केलेली प्रत पाहता येते. दरम्यान या संदर्भात आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. त्यात त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात मंडळनिहाय शिबिरे आयोजीत करून लोकांना ह्या याद्या पहावयास उपलब्ध करुन द्याव्या.
मराठवाड्यात येत्या १७ रोजी विशेष ग्रामसभा घेऊनही माहिती देण्याचे नियोजन करता येईल,असे पाटील यांनी सांगितले. तसेच संकेतस्थळावर नोंदी उपलब्ध करून देण्याच्या पुढाकाराच्या प्रयत्नाची विखे पाटील यांनी विशेष दखल घेत कौतुकही केले. या नोंदींपैकी मोडी लिपी, ऊर्दू नोंदींच्या भाषांतर, लिप्यांतराचीही सोय उपलब्ध करुन द्यावी, असे त्यांनी सांगीतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.